राष्ट्रीय

मुकेश अंबानी पुन्हा जगातील १० श्रीमंतांच्या यादीत, ५ वर्षांत संपत्ती झाली तिप्पट; फोर्ब्स अब्जाधीशांची यादी जाहीर

Swapnil S

मुंबई : जगातील प्रतिष्ठित फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा फेरबदल झाला आहे. देशातील आघाडीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि भारतातील अतिश्रीमंत अब्जाधीश मुकेश अंबानी आता जगातील आघाडीच्या १० श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ११४ अब्ज डॉलर म्हणजे ९.४५ लाख कोटी रुपये झाली असून अंबानी यांनी सर्जी ब्रिनला मागे टाकून आघाडीच्या १० श्रीमंताच्या यादीमध्ये प्रवेश केला आहे.

फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत फ्रेंच अब्जाधीश आणि लुई व्हिटॉन मोएट हेनेसीचे सीईओ बर्नार्ड अर्नाल्ट पहिल्या क्रमांकावर आहेत. अर्नाल्ट यांची एकूण संपत्ती सध्या २२२ अब्ज डॉलर्स (१८.६० लाख कोटी रुपये) असून या यादीत टेस्लाचे सीईओ एलन मस्क दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

अंबानींची संपत्ती पाच वर्षात तिप्पट

१०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये गौतम अदानी आणि मुकेश अंबानींचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. तर, मुकेश अंबानी यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांत ३६ अब्ज डॉलर्स (२.८९ लाख कोटी रुपये) वरून ११४ अब्ज डॉलर्स (९.४५ लाख कोटी रुपये) झाली आहे. म्हणजे पाच वर्षात अंबानींची एकूण संपत्ती दुपटीहून अधिक वाढली आहे.

गौतम अदानींची संपत्ती

मुकेश अंबानींव्यतिरिक्त अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी फोर्ब्सच्या रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीत १६ व्या क्रमांकावर आहेत. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ८४ अब्ज डॉलर्स (६९.६ लाख कोटी रुपये) असून जगभरातील १३ अब्जाधीशांकडे प्रत्येकी १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असताना या यादीत आघाडीच्या २० जणांमध्ये फक्त दोन भारतीय उद्योगपती आहेत.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल