मुलतानी माती केवळ सौंदर्यवर्धनासाठी वापरली जात नसून केसाचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठीही उपयुक्त ठरते.  
राष्ट्रीय

केसांसाठी फायदेशीर मुलतानी माती

Swapnil S
रुक्ष केसांसाठी- रुक्ष केस मुलायम बनवण्यासाठी 3 ते 4 चमचे मुलतानी माती, अर्धा कप दही, दोन मोठे चमचे मध, चमचाभर लिंबाचा रस घालून केस आणि मुळांना लावा. अर्ध्या तासाने धुऊन टाका.
केस गळतीवर- चार चमचे माती, दोन चमचे दही, अर्धा चमचा मिरपूड घालून पॅक तयार करा आणि केसांना लावा. हा पॅक केस गळतीवर प्रभावी ठरेल.
कोंडा- मुलतानी माती, मेथी दाणे पावडर, लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावा. केस कापडाने बांधा. थोड्या वेळाने धुऊन टाका.
केसांना फाटे फुटत असल्यास रात्री खोबरेल तेलाने मसाज करून गरम पाण्यात टॉवेल बुडवून तासभर केस बांधून ठेवा. नंतर मुलतानी मातीत दही मिसळून केसांना लावा. नंतर धुऊन टाका. दुसऱ्या दिवशी शाम्पू करा.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस