उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी 
राष्ट्रीय

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

कर्जदाराने कर्जाची संपूर्ण रक्कम परतफेड केल्यानंतर त्याने तारण ठेवलेल्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे जतन करणे आणि ती कर्जदाराला परत करणे ही बँकांचीच कायदेशीर जबाबदारी आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.

Swapnil S

मुंबई : कर्जदाराने कर्जाची संपूर्ण रक्कम परतफेड केल्यानंतर त्याने तारण ठेवलेल्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे जतन करणे आणि ती कर्जदाराला परत करणे ही बँकांचीच कायदेशीर जबाबदारी आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने मालमत्तेची मालकी दर्शवणारी मूळ कागदपत्रे गहाळ केल्याप्रकरणी ‘स्टेट बैंक ऑफ इंडिया’ला (एसबीआय) मोठा झटका दिला. न्यायालयाने मुंबईतील एका कंपनीला १ डिसेंबर २०२३ पासून दररोज पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश एसबीआयला दिले आहेत.

‘मेसर्स इन ओग क्रिएशन’ या कंपनीने १९७९ मध्ये एसबीआयकडून कर्ज घेतले होते. या कर्जापोटी प्रभादेवी आणि तळोजा येथील आपल्या दोन व्यावसायिक मालमत्तांची मूळ कागदपत्रे एसबीआयच्या दादर शाखेत जमा करण्यात आली होती. त्यानंतर २००३ मध्ये कर्जाची पूर्ण परतफेड करण्यात आली. मात्र बँक स्थलांतरित केल्यामुळे कागदपत्रे सापडत नसल्याचे कारण पुढे करून मूळ कागदपत्रे देण्यास बँकेने असमर्थता दर्शवली होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; जागतिक फिनटेक फेस्ट २०२६ चे करणार उद्घाटन

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : 'म्हात्रेसारख्यांना मोकाट फिरण्याचा अधिकार नाही' - सर्वोच्च न्यायालय

National Film Awards 2026 : ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला

गणेशोत्सवात सजावटीचा नवा ट्रेंड; यंदा LED, इको-फ्रेंडली मखर अन् कृत्रिम फुलांना पसंती

उसनवारीबाबत दोन नोटिसा; मंत्री कार्यालयांचा प्रतिसाद नाही