@IAMINDIAN345/ X
राष्ट्रीय

झारखंडमध्ये मुंबई-हावडा मेलला अपघात; १८ डबे रुळावरून घसरले, दोघांचा मृत्यू, २० जण जखमी

Mumbai-Bound Howrah Express Accident: झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मुंबई-हावडा मेलचे १८ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले असून त्यातील पाच जण किरकोळ जखमी झाले.

Swapnil S

जमशेदपूर : झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मुंबई-हावडा मेलचे १८ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले असून त्यातील पाच जण किरकोळ जखमी झाले.

हावडा येथून सोमवारी रात्री निघालेली ही हावडा मेल जमशेदपूरहून ८० किमीवरील बाराबाम्बोजवळ सकाळी ३ वाजून ४५ वाजता घसरली. या मेलचे २२ पैकी १८ डबे रुळावरून उतरले. यातील बी-४ डब्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. जखमींना तत्काळ बाराबाम्बो येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने सांगितले की, जखमींना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले आहेत. हा अपघात कशामुळे झाला? यामध्ये कोणाची चूक होती? याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?