Photo : X (Narendra Modi)
राष्ट्रीय

पंतप्रधानांचे कार्यालय 'सेवा तीर्थ'मध्ये स्थलांतरित; नव्या संकुलात येताच मोदींनी घेतले अनेक मोठे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘सेवा तीर्था’चे उद्घाटन केले. ते नवीन पंतप्रधान कार्यालय ‘सेवा तीर्थ’मध्ये स्थलांतरित झाले आहेत. दुपारी १.३० वाजता मोदींनी ‘सेवा तीर्थ’ इमारत संकुलाच्या नावाचे अनावरण केले. या संकुलात पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘सेवा तीर्था’चे उद्घाटन केले. ते नवीन पंतप्रधान कार्यालय ‘सेवा तीर्थ’मध्ये स्थलांतरित झाले आहेत. दुपारी १.३० वाजता मोदींनी ‘सेवा तीर्थ’ इमारत संकुलाच्या नावाचे अनावरण केले. या संकुलात पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय आहे. इमारतीवर ‘नागरिक देवोभव’, असे लिहिण्यात आले आहे. या संकुलात येताच मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले.

मोदी यांनी ‘सेवा तीर्थ’वरून लखपती दीदी योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ‘पीएम राहत योजने’अंतर्गत लखपती दीदींचे उद्दिष्ट दुप्पट करून ६ कोटी करण्यात आले आहे. तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी दुप्पट करून २ लाख कोटी करण्यात आला. १० हजार कोटी रुपयांच्या निधीसह ‘स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स २.०’ सुरू करण्यात आला आहे.

पंतप्रधान राहत योजना

मोदी यांनी पंतप्रधान राहत योजनेला मान्यता दिली आहे. या उपक्रमांतर्गत अपघातग्रस्तांना १.५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार आहेत. यामुळे त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध होणार असल्याने अनेकांचा जीव वाचणार आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी दुप्पट करून २ लाख कोटी रुपये करण्यात आला आहे. भारताची संपूर्ण कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याच्या उद्देशाने हा खर्च १ लाख कोटी रुपयांवरून २ लाख कोटी रुपयांपर्यंत दुप्पट करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

भारताच्या स्टार्टअप इंडिया या नाविन्यपूर्ण परिसंस्थेला पंतप्रधानांनी १०,००० कोटी रुपयांच्या निधीसह ‘स्टार्टअप इंडिया एफओएफ २.०’ला मंजुरी दिली आहे.

गेल्या काही दशकांपासून, अनेक मंत्रालये जुन्या कार्यालयांमधून काम करत होती, ज्यामुळे समन्वय समस्या, देखभाल खर्चात वाढ आणि कार्यक्षमता कमी झाली होती. मात्र आता अनेक मंत्रायले नवीन संकुलात हलवण्यात आली आहेत. यामुळे कामे सुलभ होणार आहेत. ‘सेवा तीर्थ’ आणि ‘कर्तव्य भवन’ या दोन्ही ठिकाणी प्रशासकीय कार्यक्षमता आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी डिजिटली अपडेटेड कार्यालये तयार करण्यात आली आहेत.

‘कर्तव्य भवन-१ आणि २’

‘कर्तव्य भवन-१ आणि २’मध्ये वित्त मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, कायदा व न्याय मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, रसायन व खते मंत्रालय, आदिवासी कार्य मंत्रालय असतील. ‘सेवा तीर्थ’ उभारण्यासाठी सुमारे १,१८९ कोटी रुपये खर्च आला आहे.

‘नॉर्थ-साऊथ ब्लॉक’ ब्रिटिश राजवटीचे प्रतीक - मोदी

‘नॉर्थ-साऊथ ब्लॉक’ हे ब्रिटिश राजवटीचे प्रतीक असून या गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होणे गरजेचे होते. साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉकमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय आणि धोरणे आखण्यात आली होती, परंतु या इमारती ब्रिटिश राजवटीचे प्रतीक होत्या. या मानसिकतेपासून दूर जाणे आवश्यक होते, असे मोदी म्हणाले. यावेळी टपाल तिकिट आणि नाणेही जारी करण्यात आले.

Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे

केंद्राच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब

Delhi Crime : फुटपाथवर झोपलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण; लैंगिक अत्याचारानंतर हत्या, कॅब चालक जेरबंद!

Mumbai : ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा; ८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार OC, राज्य सरकारची मंजुरी

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना