संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी एजेएलची जप्त संपत्ती ताब्यात घेणे सुरू; ईडीची कारवाई

नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग खटल्यात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची जप्त केलेली संपत्ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया 'ईडी'ने सुरू केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग खटल्यात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची जप्त केलेली संपत्ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया 'ईडी'ने सुरू केली आहे.

११ एप्रिल २०२५ रोजी ईडीने दिल्ली, मुंबई आणि लखनऊमध्ये संपत्ती रजिस्ट्रारला नोटीस पाठवली. त्याचबरोबर हेरॉल्ड हाऊसमध्ये जिंदल साऊथ वेस्ट प्रोजेक्ट्स लिमिटेडला नोटीस पाठवण्यात आली. ही कंपनी या इमारतीत सात ते नवव्या मजल्यावर भाड्याने आहे. आता दरमहा भाडे 'ईडी'कडे जमा करावे लागेल.

ईडीच्या तपासात आढळले की, या प्रकरणात ९८८ कोटी रुपयांची काळी संपत्ती मिळवली आहे. त्यामुळे २० नोव्हेंबर २०२३ रोजी 'एजेएल'ची संपत्ती व समभाग जप्त केले. ज्याचे मूल्य ७५१ कोटी रुपये आहे.

भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास सुरू झाला. त्यांनी आरोप केला होता की, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या साथीदारांनी केवळ ५० लाख रुपये देऊन एजेएलची २ हजार कोटींची संपत्ती हडप केली. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर खोट्या देणग्या, खोटी भाडी व बनावट जाहिराती आदींच्या सहाय्याने ८५ कोटी रुपयांच्या रकमेची हेराफेरी करण्यात आली. आता या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी 'ईडी'ने नोटीस देऊन प्रक्रिया सुरू केली. 'ईडी'च्या म्हणण्यानुसार, एजेएल-यंग इंडियन नेटवर्कने खोट्या देणग्यांद्वारे १८ कोटी, आगाऊ भाडे ३८ कोटी, तर जाहिरातींद्वारे २९ कोटी रुपयांचा अवैध पैसा उभारला.

विदर्भात पावसाचे थैमान; चंद्रपूर जिल्ह्यातही धूमशान; नदी-नाले तुडुंब, अनेक मार्ग बंद

गिरणी कामगारांना धारावीतच घरे द्या! उद्धव ठाकरे यांची मागणी

विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या अखेर मान्य; अधिवेशन संपल्यानंतर खात्यात पगार जमा होणार - गिरीश महाजन

तुकडेबंदी कायदा शिथिल; ५० लाख शेतकऱ्यांना दिलासा

Guru Purnima Wishes 2025 : तुमच्या गुरूंना पाठवा खास मराठी शुभेच्छा, WhatsApp स्टेटस आणि Quotes!