राष्ट्रीय

सोनिया, राहुल यांच्या अडचणी वाढणार? नॅशनल हेराल्डप्रकरणी न्यायालयाची नोटीस

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणाशी संबंधित सुनावणीसाठी नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आल्याने या दोघांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणाशी संबंधित सुनावणीसाठी नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आल्याने या दोघांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित खटल्यासंदर्भातील आरोपपत्र दाखल केले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर आता न्यायालयाने सोनिया आणि राहुल यांच्यावर नोटीस बजावली आहे.

८ मे रोजी पुढील सुनावणी

दरम्यान, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतरांचे नाव ईडीने आरोपपत्रात घेतले आहे, त्या सर्वांना सुनावणी घेण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे.

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने नमूद केले की, या खटल्याबाबत ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्याविरुद्ध खटला औपचारिकपणे सुरू करायचा की नाही हे न्यायालय ठरवण्यापूर्वी त्यांना सुनावणीचा विशेष अधिकार आहे. निष्पक्ष सुनावणी सुनिश्चित करण्यासाठी नोटीस जारी करण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत