राष्ट्रीय

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण : राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच पक्ष, कोणताही गट नाही!

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू झाली आहे.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही वा गटही नाही. एकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. २०१५ साली राज्य प्रतिनिधींनी मला प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडून दिले होते. मात्र त्यानंतर पक्षात निवडणुकाच झाल्या नसल्याचा दावा खा. सुनील तटकरे यांनी केला आहे. अजित पवार यांनी २०१९ साली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास पक्षनेतृत्वाचा पाठिंबा होता, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू झाली आहे. शरद पवार गटाच्या आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची बुधवारी उलटतपासणी झाली. त्यानंतर गुरुवारी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उलटतपासणी पार पडली. शरद पवार गटाचे वकील जगतियानी यांनी सुनील तटकरे यांची उलटतपासणी घेतली. अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आलेली प्रक्रिया यावर वकिलांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला. २१ जून रोजी झालेल्या बैठकीत शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष होते. अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष नेमके कधी करण्याचे ठरले? सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी कधी निवड झाली? हा निर्णय झाला त्याची बैठक कधी पार पडली? आणि कोणत्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला, असे प्रश्न वकिलांकडून उपस्थित करण्यात आले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारच्या काळात १४ मंत्री होते. त्यापैकी ९ मंत्री अजित पवार गटाचे होते हे माहीत होते का, असाही सवाल करण्यात आला असता यावर राष्ट्रवादीत कोणतेही गट-तट नाही. अजित पवार यांची बहुमताने निवड झाली होती. २०१५ साली आपण प्रदेशाध्यक्षपदी निवडून आलो, त्यानंतर निवडणूक झाली नसल्याचे सुनील तटकरे म्हणाले.

अजितदादांच्या त्या शपथविधीला पक्षनेतृत्वाचा पाठिंबा -सुनील तटकरे

अजित पवार यांनी २०१९ साली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची युती होती का, या शपथविधीला पक्षनेतृत्व आणि इतर पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा होता का, असा प्रश्न तटकरे यांना केला असता या शपथविधीला पक्षनेतृत्वाचा पाठिंबा होता, असे स्पष्ट केले. त्यांना शपथविधीसाठी कशी मान्यता देण्यात आली, यावर मात्र तटकरे यांनी सांगता येणार नाही असे उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीवेळी शरद पवार हे उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे, रोहित पवार हेही उपस्थित होते.

NEET ची खोटी गुणपत्रिका बनवून जे. जे. हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये बेकायदेशीर वास्तव्य; २१ वर्षीय तरुणाला अटक

सोनिया गांधी, राहुल गांधींना मोठा दिलासा! नॅशनल हेराल्ड केसमध्ये कोर्टाने ED ची तक्रार फेटाळली; "FIR नसेल तर मनी लॉन्ड्रींग...

Arjuna Ranatunga: श्रीलंकेत मोठी घडामोड; वर्ल्डकप विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगाला होणार अटक; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

विनम्र राहा! अनुष्का शर्मा-विराट कोहली पुन्हा प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला; भावूक क्षणांचा Video व्हायरल

"आम्ही जर युती म्हणून सोबत निवडणूक लढवली तर..."; पुण्यात अजित पवारांच्या NCP सोबत का नाही लढणार? फडणवीसांनी केलं स्पष्ट