NEET परीक्षा : विद्यार्थ्यांना दिलासा; 'एनटीए'कडून परीक्षेच्या वेळेत वाढ 'एआय' ने बनविलेली प्रतिमा
राष्ट्रीय

NEET परीक्षा : विद्यार्थ्यांना दिलासा; 'एनटीए'कडून परीक्षेच्या वेळेत वाढ

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या 'नीट' परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या 'नीट' परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) यंदा विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेतले असून, त्यामध्ये परीक्षेची वेळ वाढवणे आणि 'रफ वर्क'साठी (कच्च्या कामासाठी) जादा पानांची सोय करणे यांसारख्या विद्यार्थी-स्नेही उपायांचा समावेश आहे. आगामी २१ जून रोजी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा देशभरात घेतली जाणार आहे.

'एनटीए'ने दिलेल्या माहितीनुसार, यंदा नीट परीक्षा दुपारी २ ते संध्याकाळी ५:१५ या वेळेत घेतली जाईल. म्हणजेच विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी एकूण १९५ मिनिटांचा वेळ मिळणार आहे. मूळ वेळेत १५ मिनिटांची वाढ करण्यात आली आहे.

बदलांमुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी

परीक्षेच्या रचनेत केलेले हे छोटे पण विचारपूर्वक बदल विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील. 'नीट २०२६' परीक्षा अत्यंत सुरक्षित, पारदर्शक आणि विद्यार्थी-स्नेही वातावरणात पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे एनटीएने म्हटले आहे.

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video