NEET Paper Leak : पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही; धर्मेंद्र प्रधान यांचा निर्वाळा 
राष्ट्रीय

NEET Paper Leak : पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही; धर्मेंद्र प्रधान यांचा निर्वाळा

येत्या २१ जून रोजी होणारी नीट-यूजी फेरपरीक्षा त्रुटीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्व तयारी पूर्ण केली असून पूर्वीच्या चुका होऊ दिल्या जाणार नाहीत अशी ग्वाही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : येत्या २१ जून रोजी होणारी नीट-यूजी फेरपरीक्षा त्रुटीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्व तयारी पूर्ण केली असून पूर्वीच्या चुका होऊ दिल्या जाणार नाहीत अशी ग्वाही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी दिली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही चिंतेविना केवळ आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या मुख्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर प्रधान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा केंद्रांपर्यंत त्या सुरक्षित पोहोचवण्यापर्यंत या वेळी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

'सीईआरटी-इन', 'आयफोरसी', गुप्तचर विभाग, सीबीआय आणि गृह मंत्रालय यांसारख्या सर्व प्रमुख संस्था सायबर सुरक्षेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे त्यांनी नमूद केले. ही फेरपरीक्षा देशातील ५५१ शहरांमध्ये ५,४३५ केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. यामध्ये भारताबाहेरील १४ केंद्रांचाही समावेश आहे. या परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर केले जातील.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार