राष्ट्रीय

New Raw Chief Parag Jain : पराग जैन 'रॉ'चे नवे प्रमुख; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये होती महत्त्वाची भूमिका

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आयपीएस अधिकारी पराग जैन यांची देशाची गुप्तचर संस्था 'रॉ'च्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. विद्यमान रॉ प्रमुख रवी सिन्हा यांच्या कार्यकाळ ३० जून रोजी पूर्ण होत आहे. पराग जैन १ जुलै रोजी पुढील दोन वर्षांसाठी 'रॉ' प्रमुखपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आयपीएस अधिकारी पराग जैन यांची देशाची गुप्तचर संस्था 'रॉ'च्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. विद्यमान रॉ प्रमुख रवी सिन्हा यांच्या कार्यकाळ ३० जून रोजी पूर्ण होत आहे. पराग जैन १ जुलै रोजी पुढील दोन वर्षांसाठी 'रॉ' प्रमुखपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

पराग जैन हे १९८९ च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. सध्या ते एव्हिएशन रिसर्च सेंटरचे प्रमुख आहेत. या केंद्रानेच नुकतेच राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये पाकिस्तानी सशस्त्र दल आणि दहशतवादी छावण्यांच्या ठिकाणांविषयी महत्त्वाची माहिती गोळा करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

पंजाबमध्येही महत्त्वाची भूमिका

पंजाबमध्ये ९० च्या दशकात दहशतवादाने थैमान घातले होते. या काळात जैन यांनी भटिंडा, मानसा, होशियारपूर येथे कार्यरत राहून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी चंदीगडचे एसएसपी आणि लुधियानाचे डीआयजी म्हणूनही काम पाहिले होते. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे लम ३७० रद्द करताना आणि 'ऑपरेशन बालाकोट' दरम्यान ते जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत होते. पराग जैन यांनी कॅनडा आणि श्रीलंकेत भारताचे प्रतिनिधी म्हणूनही सेवा बजावली आहे.

आव्हाने

पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी द्वेषपूर्ण भाषणे करून काश्मीरला पाकिस्तानची 'जीवनवाहिनी' म्हटले. यानंतर २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. आता असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती मिळाल्याने आणि भारताविरुद्ध सीमापार दहशतवाद त्यांच्या अजेंड्यावर अग्रस्थानी असल्याने 'रॉ'ची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनली आहे. भारताने सिंधू पाणी वाटप करार स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तान प्रत्युत्तर म्हणून दहशतवादाचा वापर करण्याची शक्यता आहे. अशा आव्हानात्मक काळात रॉचे प्रमुखपद पराग जैन यांच्याकडे आले आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’