संग्रहित छायाचित्र  
राष्ट्रीय

...तर वाहनचालकांचे फास्टॅग जाणार काळ्या यादीत; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा नवा नियम लागू

वाहनांच्या समोरील काचेवर दर्शनी भागावर फास्टॅग न लावणे वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे. महामार्गावर प्रवास करताना टोल नाक्यांवर फास्टॅग हातात घेऊन दाखविणाऱ्या वाहनचालकांचे फास्टॅग काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) लागू केला आहे.

Swapnil S

मुंबई : वाहनांच्या समोरील काचेवर दर्शनी भागावर फास्टॅग न लावणे वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे. महामार्गावर प्रवास करताना टोल नाक्यांवर फास्टॅग हातात घेऊन दाखविणाऱ्या वाहनचालकांचे फास्टॅग काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) लागू केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या वाहन चालकांना मोठा फटका बसणार आहे.

महामार्गावर प्रवास करताना अनेक वाहन चालक फास्टॅग वाहनाच्या समोरील काचेवर न चिकवता, वाहनचालक ते हातात घेऊन टोल स्कॅनरसमोर दाखवतात. यामुळे टोल भरण्याचा वेळ लागून टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच्या रांगा लागतात. त्यामुळे नवीन नियमानुसार वाहनांच्या दर्शनी भागावर फास्टॅग न लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल.

टोल नाक्यावर फास्टॅग हातात धरून स्कॅन करण्याचा आग्रह करणाऱ्या वाहन चालकांमुळे इतर प्रवाशांची गैरसोय होते. हे टाळण्यासाठी वाहनांच्या समोरील काचेवर फास्टॅग न लावणारे फास्टॅग काळ्या यादीत टाकण्यात येणार आहेत.

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्यातील बहुतांश जिल्ह्यात २५ जुलैपर्यंत जोरदार पाऊस

१२ निरपराधांचा सगळा उमेदीचा काळ जेलमध्ये गेला, महाराष्ट्र ATS च्या 'त्या' अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करणार का? - ओवैसी

2006 Mumbai Local Train Blasts: मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता, HC चा निकाल

“महाराष्ट्रात वाईट अनुभव'' ED च्या कारभारावर सर्वोच्च न्यायालयाचा संताप; सरन्यायाधीश म्हणाले, ''तोंड उघडायला लावू नका''

राज्यात पोलिसांविरोधातील तक्रारींमध्ये वाढ; सहा महिन्यांत ४८७ तक्रारी, केवळ ४५ प्रकरणांचा निकाल