राष्ट्रीय

कफ सिरपमुळे मृत्यू : मानवी हक्क आयोगाची नोटीस

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सोमवारी मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे. कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूच्या आरोपांची चौकशी करण्याचे आणि बनावट औषधांची विक्री तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सोमवारी मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस जारी केली आहे. कफ सिरपमुळे मुलांच्या मृत्यूच्या आरोपांची चौकशी करण्याचे आणि बनावट औषधांची विक्री तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय, औषध नियंत्रक महासंचालक, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि आरोग्य सेवा महासंचालक यांना बनावट औषध पुरवठ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत तसेच सर्व राज्यातील प्रादेशिक प्रयोगशाळांना बनावट औषधांचे नमुने गोळा करून चाचणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित राज्यातील सर्व मुख्य औषध नियंत्रकांना बनावट औषधांवर ताबडतोब बंदी घालण्याचे आदेश देणे व अहवाल सादर करणे हे प्राधिकरणाने आदेशित केले आहेत, असे आयोगाने नोटिसीत म्हटले आहे. आयोगाला मध्य प्रदेश व राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये १२ मुलांच्या मृत्यूप्रकरणी तातडीच्या हस्तक्षेपाची तक्रार प्राप्त झाली आहे.

आयोगाच्या सदस्य प्रियंक कनुगो यांच्या अध्यक्षतेखालील बेंचने १९९३ च्या मानवाधिकार संरक्षण कायद्याचा विचार केला आहे.

नोटीसमध्ये म्हटले की, ‘राजस्थान, जयपूर येथील आरोग्य व कौटुंबिक कल्याण विभागाचे मुख्य सचिव, मध्य प्रदेश, भोपाल येथील आरोग्य व कौटुंबिक कल्याण विभागाचे मुख्य सचिव आणि उत्तर प्रदेश, लखनऊ येथील आरोग्य व कौटुंबिक कल्याण विभागाचे मुख्य सचिव यांना नोटीस जारी करून तक्रारीत केलेले आरोप तपासण्याचे, कफ सिरपाचे नमुने प्रादेशिक लॅबमध्ये तपासणीसाठी गोळा करणे व बनावट औषधांची तत्काळ विक्री बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

FICCI FRAMES 2025 : "सर, तुम्ही संत्री कशी खातात?"अक्षय कुमारचा फडणवीसांना मजेशीर सवाल; मुख्यमंत्र्यांनी दिलं 'ओजी नागपूरकर' उत्तर

CJI अवमान प्रकरण : शरद पवार गटाचे संविधान सन्मान आंदोलन; रोहित पवार म्हणाले, ''मनुवादी प्रवृत्ती...

Thane : मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबर, तर ३१ डिसेंबरपर्यंत मेट्रो ४ सुरू करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

ठाणेकरांवर पाणीकपातीचे संकट; तीन दिवस १० टक्के पाणीकपात; नागरिकांना काटकसरीने वापराचे आवाहन

नवी मुंबई विमानतळ मुंबईशी जोडण्यासाठी बोगदा; प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्याचे MMRDA ला निर्देश