राष्ट्रीय

काश्मीरमध्ये एनआयएचे छापे दहशतवाद्यांना फंडिंगप्रकरणी कारवाई

Swapnil S

जम्मू : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक छापे टाकून दहशतवादी फंडिंग आणि तरुणांच्या कट्टरपंथीकरणात गुंतलेल्या घटकांविरुद्ध कारवाई केली.

जम्मू शहरातील गुजर नगर आणि शहिदी चौकासह वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षांच्या घरासह तिच्या तीन कार्यकर्त्यांशी संबंधित खासगी शाळा आणि परिसरावर पथकाने छापे टाकले. कुलगाम जिल्ह्यात जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीरच्या प्रतिबंधित संघटनेच्या दोन माजी नेत्यांच्या घरांची झडती घेण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जमातचे माजी प्रमुख शेख गुलाम हसन आणि आणखी एक नेता सय्यर अहमद रेशी यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीरवर केंद्राने फेब्रुवारी २०१९ मध्ये पाच वर्षांसाठी बंदी घातली होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस