राष्ट्रीय

"बिनशर्त माफी मागा"; बिहारचे CM नितीश कुमार यांनी महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याच्या प्रकारावर जावेद अख्तरांचा संताप

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात नियुक्तीपत्र देताना एका महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याच्या घटनेवर ज्येष्ठ गीतकार व पटकथालेखक जावेद अख्तर यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. नितीश कुमार यांनी संबंधित महिला डॉक्टरची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. "मला अगदी वरवर ओळखणाऱ्यांनाही माहितीये की मी पारंपरिक ‘पडदा’ संकल्पनेचा विरोधक आहे. मात्र...

Krantee V. Kale

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात नियुक्तीपत्र देताना एका महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याच्या घटनेवर ज्येष्ठ गीतकार व पटकथालेखक जावेद अख्तर यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. नितीश कुमार यांनी संबंधित महिला डॉक्टरची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गुरुवारी (१८ डिसेंबर) ‘एक्स’ (माजी ट्विटर)वर पोस्ट करत जावेद अख्तर यांनी या घटनेवर भाष्य केलं. "मला अगदी वरवर ओळखणाऱ्यांनाही माहितीये की मी पारंपरिक ‘पडदा’ संकल्पनेचा विरोधक आहे. मात्र याचा अर्थ असा अजिबात होत नाही की नितीश कुमार यांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरसोबत जे केलं, ते मी कधीही स्वीकारू शकतो. मी या प्रकाराचा अत्यंत तीव्र शब्दांत निषेध करतो. नितीश कुमार यांनी त्या महिलेची बिनशर्त माफी मागितली पाहिजे.” असे अख्तर म्हणाले.

नेमकं काय घडलं होतं?

ही घटना सोमवारी पाटणा येथे झालेल्या एका कार्यक्रमात घडली होती. या कार्यक्रमात नितीश कुमार आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वितरीत करत होते. संबंधित महिला डॉक्टरचे नाव नुसरत परवीन आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे महिला डॉक्टरला नियुक्तीपत्र देतात. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर असलेल्या हिजाबबाबत ते प्रश्न विचारतात. त्यानंतर ते स्वतःच हाताने तो हिजाब खाली ओढतात. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, नितीश कुमार यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा माफी जाहीर करण्यात आलेली नाही.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके