Photo - FPJ
राष्ट्रीय

UP: राष्ट्रीय दलित प्रेरणा स्थळी पोलिसांसमोरच तरुणाचा अश्लील डान्स; लोकांचा तीव्र संताप|Video

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये महिलांचे अंतर्वस्त्र आणि साडी परिधान करून एका तरुणाने थेट पोलिसांसमोरच रील केल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नोएडामधील राष्ट्रीय दलित प्रेरणा स्थळी त्याने हा अश्लील रील केल्याने लोकांनी सोशल मिडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नेहा जाधव - तांबे

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये महिलांचे अंतर्वस्त्र आणि साडी परिधान करून एका तरुणाने थेट पोलिसांसमोरच रील केल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नोएडामधील राष्ट्रीय दलित प्रेरणा स्थळी त्याने हा अश्लील रील केल्याने लोकांनी सोशल मिडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शुक्रवारी, २५ जुलै रोजी दोन व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्या. पहिल्या व्हिडिओमध्ये एक तरुण महिलांचे अंतर्वस्त्र घालून आणि साडी नेसून गाण्यावर नाचताना दिसतो. तिथेच एक गणवेशातील पोलिस अधिकारी उभा असून, त्या अधिकाऱ्याभोवती तो अश्लील हावभाव करत नाचत आहे. संबंधित पोलिस अधिकारी निष्क्रियपणे फक्त पाहात असल्याचे दिसते. दुसऱ्या व्हिडिओत तोच तरुण दुसऱ्या व्यक्तीसोबत अश्लील नृत्य करत आहे.

तरुणाचे सोशल मिडियावर १.५ लाख फॉलोवर्स -

‘neerajhero69’ या इंस्टाग्राम अकाउंटवर असे अनेक अश्लील व्हिडिओ पोस्ट करण्यात आले असून, त्याचे नाव नीरज कुमार आहे. या अकाउंटला सुमारे १.५ लाख फॉलोवर्स आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोकांनी या तरूणाविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली. प्रमोद कुमार आझाद नावाच्या सोशल मीडिया वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर करत यूपी आणि नोएडा पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. त्याने इशारा दिला की, "अशा कृत्यांवर जर वेळेत कारवाई केली नाही, तर भीम आर्मी स्वतः हस्तक्षेप करेल, आणि त्याची जबाबदारी उद्यानाच्या सुरक्षा यंत्रणांवर राहील."

सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, संबंधित व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी म्हटले की, अशा प्रकारच्या अश्लील कृत्यांवर आणि पोलिस शिष्टाचाराचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जातील.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास