राष्ट्रीय

आयआरसीटीसी वरून आता २४ तिकिटे बुक करता येणार

वृत्तसंस्था

सध्या रेल्वेचे तिकिटांचे जास्तीत जास्त बुकिंग हे आयआरसीटीसी बेवसाईट व अॅपवरून केले जाते. आतापर्यंत महिन्याला वापरकर्त्यांना १२ तिकिटे बुकिंग करता येत होती. आता ही संख्या २४ वर नेण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, ज्या वापरकर्त्यांचे लॉगइन आधारशी लिंक केलेले नाही. त्यांना दरमहा १२ तिकिटे बुक करता येतील. आधार लिंक युजर आयडी असलेल्या ग्राहकांसाठी जास्तीत जास्त तिकीट बुक संख्या १२ वरून २४ करण्यात आली आहे. जे लोक वारंवार ये-जा करतात त्यांच्यासाठी ही सुविधा खूप उपयुक्त आहे. यासोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी तिकीट बुक करण्यासाठी समान आयडी वापरणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

आतापर्यंत, इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने आधार कार्ड लिंक केलेल्या खात्याशिवाय एका महिन्यात सहा तिकिटांची बुकिंग करण्याची परवानगी दिली होती. त्याच वेळी, आधार कार्ड लिंक केलेल्या खात्याने एक महिन्यात १२ तिकिटे बुक करण्याची परवानगी दिली होती; मात्र आता नव्या नियमानुसार यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण