राष्ट्रीय

आता वेषांतरित गुन्हेगारांचा छडा सॉफ्टवेअर लावणार

दाढी, मिशी, मास्क, स्कार्फ, टोपी, मंकी कॅप घातलेल्या व्यक्तीचा खराब फोटो असला तरीही त्याची ओळख पटवता येणार आहे.

वृत्तसंस्था

गुन्हेगार पोलीस यंत्रणांना चकवा देण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवत असतात. वेषांतर करून चेहऱ्यात बदल करून ते तपास यंत्रणांना फसवत असतात. आता त्यांची लबाडी उघड काढणारे सॉफ्टवेअर डीआरडीओने तयार केले आहे. याच्या मदतीने वेषांतर किंवा चेहरा बदललेल्या व्यक्तीची ओळख पटवता येणार आहे. या सॉफ्टवेअरला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड दिली आहे. त्याच्या सहाय्याने दाढी, मिशी, मास्क, स्कार्फ, टोपी, मंकी कॅप घातलेल्या व्यक्तीचा खराब फोटो असला तरीही त्याची ओळख पटवता येणार आहे.

नवीन सॉफ्टवेअरचे नाव ‘फेस रिकग्निशन सिस्टीम अंडर डिसगाईज’ असे आहे. याचा उल्लेख संरक्षण मंत्रालयाच्या ‘संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या अहवालात केला आहे. या यंत्रणेचा उद्देश वेषांतर करून फिरणाऱ्या दहशतवाद्यांना व गुन्हेगार लोकांना पकडणे आहे. ही यंत्रणा अल्गोरिदमवर काम करत आहे. याद्वारे अत्यंत कमी क्षमतेच्या कॅमेऱ्यातूनही संबंधित लोकांची ओळख पटवू शकते. हे काम मानवी डोळ्यांना जमू शकत नाही.

सुरक्षा यंत्रणा आपल्या डेटाबेसमधील कोणत्याही चेहऱ्याच्या शोधासाठी याचा वापर करू शकतात.

येथे होणार वापर

विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, बाजार व गर्दीच्या ठिकाणी केला जाऊ शकतो. यातून लाईव्ह व्हिडीओ टेहळणी केली जाऊ शकते. तसेच ही यंत्रणा सीमेवरही लावता येणार आहे. ही यंत्रणा एकाच वेळी अनेक कर्मचाऱ्यांना सहाय्य करू शकते. आग, लोकांची मोजणी व टक्कर होण्याचे कारणही शोधू शकते. कमी प्रकाशात, चेहऱ्यावर सावली पडल्यास तसेच अत्यंत गर्दीच्या ठिकाणी ती संबंधित व्यक्तीला ओळखू शकते. डीआरडीओने यापूर्वीही कृत्रिम बुद्धिमत्तेवर ‘प्रोजेक्ट सीकर’ ही यंत्रणा बनवली आहे.

Mumbai : अनधिकृत फेरीवाल्यांची तक्रार आता व्हॉट्सॲपवर; BMC ची नवी सुविधा सुरू

NEET UG 2026 Re-Exam : परीक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; २१ जूनचा मेगाब्लॉक रद्द

Mumbai : पावसाळ्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज; ट्रॅक सर्किट बिघाड रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

NEET पुनर्परीक्षा होईपर्यंत Telegram वर बंदी; केंद्राच्या निर्णयाविरोधात कंपनीची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

'पास करून देतो' म्हणत विद्यार्थिनींशी गैरवर्तन; संतप्त पालकांकडून शिक्षकाला चोप