NSE जगातील सातवे एक्स्चेंज; शेअर बाजार बीएसईवर सूचिबद्ध पदार्पणात मूल्य वाढ (Photo-X)
राष्ट्रीय

NSE जगातील सातवे एक्स्चेंज; शेअर बाजार बीएसईवर सूचिबद्ध पदार्पणात मूल्य वाढ

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या (एनएसई) शेअर्सनी गुरुवारी बाजारातील पहिल्याच व्यवहारात २ टक्क्यांची वाढ नोंदवत व्यवहार बंद केले.

Swapnil S

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाच्या (एनएसई) शेअर्सनी गुरुवारी बाजारातील पहिल्याच व्यवहारात २ टक्क्यांची वाढ नोंदवत व्यवहार बंद केले. यामुळे या एक्स्चेंजचे बाजार मूल्य ४.४९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून ते जगातील पहिल्या सात प्रमुख एक्स्चेंजेसच्या यादीत समाविष्ट झाले आहे.

बीएसईवर १,७८५ रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत हा शेअर १,८०० रुपयांवर खुला झाला. ते ०.८४ टक्क्यांनी किरकोळ जास्त होते. व्यवहारादरम्यान शेअर्सनी ५.२१ टक्क्यांची उसळी घेत १,८७८ रुपयांपर्यंत मजल मारली आणि अखेर १.८५ टक्क्यांच्या वाढीसह १,८१८ रुपयांवर बंद झाला. एनएसईने ४,४९,९५५ कोटी रुपयांचे बाजार भांडवल प्राप्त केले आणि बीएसईवरील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत ११ वे स्थान पटकावले.

  • एनएसईचा २२,५६९ कोटी रुपयांचा हा प्राथमिक भागविक्री देशातील दुसरा सर्वात मोठा आयपीओ ठरला. संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या प्रचंड मागणीमुळे सोमवारी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी तो ६ पट सब्सक्राइब झाला.

  • २०२४ मधील युंदाई मोटर इंडियाच्या २७,८७० कोटी रुपयांच्या आयपीओनंतर हा भारतातील दुसरा सर्वात मोठा आयपीओ ठरला. या आयपीओने २०२२ मधील एलआयसीच्या २१,००० कोटी रुपयांच्या आयपीओला मागे टाकले.

वेळ चुकलेली नाही...

आयपीओ सादर करण्यासाठी ही योग्य वेळ आहे की नाही याबद्दल विचार विनिमय झाल्याचे सांगत एनएसईचे अध्यक्ष श्रीनिवास इंचेट्टी म्हणाले, आम्ही अखेर असा विचार केला की, बाजारातील व्हॅल्युएशन महत्त्वाचे नसून कंपनीचे मूळ मूल्य महत्त्वाचे आहे. तुमचा कंपनीच्या मूल्यावर विश्वास असेल, तर कोणतीही वेळ योग्य किंवा अयोग्य नसते, असे त्यांनी नमूद केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बाप्पाला निरोप देण्यासाठी ठाणे शहरासह संपूर्ण जिल्हा सज्ज; ठाणे, कल्याण-बदलापूर, भिवंडी परिसरात ४,५०० पोलिसांचा फौजफाटा

११ वर्षांत दुष्काळाचा सातवा फेरा; यंदा दुष्काळाची परिस्थिती अतिभीषण

Thane : पितृपक्षात तर्पण विधी महागले; सामान्यांच्या आवाक्याबाहेर दक्षिणा, कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी

उरण : जेएनपीए बंदरावर तीन कोटींचे बेकायदेशीर फटाके जप्त; DRI च्या अधिकाऱ्यांची कारवाई, मुख्य संशयिताला अटक

Thane : शनिवारी काही भागातील पाणीपुरवठा बंद