NTA मध्ये तीन नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या  (NTA website)
राष्ट्रीय

NTA मध्ये तीन नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि इतर अनियमिततांमुळे चौफेर टीकेचा सामना करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये (एनटीए) केंद्र सरकारने मोठे प्रशासकीय बदल केले आहेत. केंद्र सरकारने ‘एनटीए’मध्ये दोन नवीन संचालक आणि एका सहसंचालकाची नियुक्ती केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि इतर अनियमिततांमुळे चौफेर टीकेचा सामना करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये (एनटीए) केंद्र सरकारने मोठे प्रशासकीय बदल केले आहेत. केंद्र सरकारने ‘एनटीए’मध्ये दोन नवीन संचालक आणि एका सहसंचालकाची नियुक्ती केली आहे.

कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या वेगवेगळ्या आदेशांनुसार, भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी रवी कुमार सिंग आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रसन्न व्यंकटेश व्ही. यांची 'एनटीए'च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, भारतीय महसूल सेवेच्या २०१६ च्या तुकडीचे अधिकारी अमित समदरिया यांची 'एनटीए'च्या सहसंचालकपदी निवड करण्यात आली आहे.

'नीट' परीक्षेच्या गोंधळानंतर सरकारने नुकतीच एनटीएच्या संपूर्ण परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणांची घोषणा केली आहे. यामध्ये उत्तरपत्रिका तपासणीसाठी चार-स्तरीय यंत्रणा लागू करणे, ६०० जुन्या तज्ज्ञांना पॅनेलवरून हटवणे आणि नवीन विषय तज्ज्ञांचा समावेश करणे यांसारख्या महत्त्वाच्या पावलांचा समावेश आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत 'पार्किंग' महागणार, १० टक्के दरवाढीचा प्रस्ताव; पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी होणार सादर

सोनिया गांधी यांचे पुस्तक छापण्यास नकार

Navi Mumbai : 'एसआयआर' फॉर्मची झेरॉक्स; भाजप पदाधिकारी अटकेत, खारघर पोलिसांची कारवाई

Mumbai : दूध १०२ रुपये लिटर; घाऊक दरात ९ रुपये वाढ; १ सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार

Nepal Floods : राज्यातील ६० पर्यटकांशी अद्याप संपर्क नाही; २९० जण सुरक्षित, १०५ जण भारताच्या दिशेने रवाना