राष्ट्रीय

ओदिशाचे मुख्यमंत्री पटनाईक दोन मतदारसंघातून लढणार

ओदिशा विधानसभा निवडणुकीसाठी पटनाईक यांनी बुधवारी नऊ उमेदवारांच्या नावांची पाचवी यादी जाहीर केली. गेल्या निवडणुकीतही पटनाईक दोन मतदारसंघातून लढले होते.

Swapnil S

भुवनेश्वर : ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे आपल्या हिंजीली या पारंपरिक मतदारसंघासह बोलनगीर जिल्ह्यातील कांताबानजी मतदारसंघातूनही विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. पटनाईक यांनी बुधवारी स्वत:च तशी घोषणा केली आहे.

ओदिशा विधानसभा निवडणुकीसाठी पटनाईक यांनी बुधवारी नऊ उमेदवारांच्या नावांची पाचवी यादी जाहीर केली. गेल्या निवडणुकीतही पटनाईक दोन मतदारसंघातून लढले होते. हिंजीली आणि बिजेपूर या दोन्ही जागा त्यांनी जिंकल्या होत्या.

पटनाईक यांनी बुधवारी जाहीर केलेल्या नऊ उमेदवारांमध्ये सहा महिला आणि चार जण अन्य पक्षातून आलेले आहेत. तर चार विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.

मुद्रांक शुल्क अधिभारातून महापालिकांना ४२१ कोटींचे अनुदान; पुणे महापालिकेला सर्वाधिक १०९ कोटी, नाशिकला २१ कोटी २५ लाख रुपये

कपडे धुणे झाले आता महाग; 'सर्फ एक्सेल', 'रिन', 'व्हील'च्या किमतीत ११ टक्क्यांपर्यंत वाढ

फटाक्यांच्या आतषबाजीने मुंबईचा श्वास कोंडला; लक्ष्मीपूजनानंतर प्रदूषणात मोठी वाढ; सरासरी AQI १७१, आठ ठिकाणी हवा 'खराब' श्रेणीत

विद्याविहारमध्ये आग विझवण्यासाठी स्विमिंग पूलमधील पाण्याचा आधार; अग्निशमन दलाकडे अवघे २२ वॉटर टँकर, ४२ फायर इंजिन

Nashik : सोनं खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरले अन् अडीच तोळ्यांच्या अंगठ्या घेऊन पळाले! दोघांची हातचलाखी CCTV मध्ये कैद