राईडपूर्वीच 'टिप' मागणे OLA ला पडले महागात  प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

राईडपूर्वीच 'टिप' मागणे OLA ला पडले महागात

प्रवाशांची दिशाभूल करणे आणि भ्रामक व्यावसायिक पद्धतींचा अवलंब करणे ओला कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) राईड-हेलिंग प्लॅटफॉर्म 'ओला' चालवणाऱ्या 'एएनआय टेक्नॉलॉइज प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीवर १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : प्रवाशांची दिशाभूल करणे आणि भ्रामक व्यावसायिक पद्धतींचा अवलंब करणे ओला कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) राईड-हेलिंग प्लॅटफॉर्म 'ओला' चालवणाऱ्या 'एएनआय टेक्नॉलॉइज प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीवर १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रवाशांचा प्रवास पूर्ण होण्याआधीच त्यांच्याकडून अतिरिक्त रक्कम किंवा 'टिप' मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मुख्य आयुक्त निधी खरे आणि आयुक्त अनुपम मिश्रा यांच्या आदेशानुसार कंपनीला ही प्रॅक्टिस तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्राहकाने प्रवास पूर्ण केल्यानंतर स्वेच्छेने दिली जाणारी टिप प्रवास सुरू होण्यापूर्वीच मागितल्याने ही सक्तीची वसुली ठरत असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले. ओलाच्या या फिचरमुळे प्रवाशांची दिशाभूल होत असून हा प्रकार 'डार्क पॅटर्न' आणि 'अनैतिक व्यावसायिक पद्धत' असल्याचे सीसीपीएने म्हटले आहे.

कंपनीने याआधी हे फिचर 'टिप' ऐवजी 'ॲड-ऑन' नावाने बदलले होते, मात्र मूळ पद्धतीत कोणताही फरक पडलेला नाही. प्रवाशांना गाडी लवकर मिळण्यासाठी अतिरिक्त पैसे देण्याचे प्रलोभन या माध्यमातून दाखवले जात होते. १ ते १५ जून २०२६ दरम्यानच्या ओलाच्या स्वतःच्या आकडेवारीनुसार, अतिरिक्त पैसे देणाऱ्या राईड रिक्वेस्ट्स त्या न देणाऱ्यांच्या तुलनेत कमी वेळा स्वीकारल्या गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मोदी माझा फोन टॅप करतात...; राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप

नियोजित आंदोलनापूर्वी वांगचुक यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; घराबाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

मायक्रोसॉफ्ट सेवा ठप्प; तांत्रिक बिघाडाचा फटका आशियापासून अमेरिकेपर्यंत

भारतीय युवकांसमोर आज पाकिस्तानचे कडवे आव्हान; १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची चर्चा

Mumbai : कोस्टल रोडवरील बोगद्यात ६ वाहनांचा विचित्र अपघात; धडकेनंतर SUV ने घेतला पेट