File Photo 
राष्ट्रीय

लखनऊ-आग्रा द्रूतगती मार्गावर बस अपघातात एक ठार, ७ जखमी

जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला

Swapnil S

फिरोझाबाद : लखनऊ-आग्रा द्रूतगती मार्गावर शनिवारी पहाटे एक खासगी बस व अज्ञात वाहन यांच्या टकरीत खासगी बसचा चालक ठार झाला, तर सात प्रवासी जखमी झाले. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) रणविजय सिंह यांनी सांगितले की, बनारसहून जयपूरला जात असलेल्या एका खासगी बसची नागला खंगार पोलीस ठाणे परिसरात टक्कर झाली. बसचालक धरमपाल (२८) हा राजस्थानमधील बिकानेरचा रहिवासी असून, या घटनेत त्याचा मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले. सिंह यांनी सांगितले की, जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून चालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश