हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह  Photo : X (@NetramDefence)
राष्ट्रीय

पाकिस्तानला चार दिवसांत धूळ चारली! हवाई दल प्रमुखांनी केला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा उलगडा

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय हवाई दलाने केवळ चार दिवसांत शत्रूवर विजय मिळवला. काळजीपूर्वक नियोजन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि दृढनिश्चय याद्वारे काय साध्य करता येते, याचे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे एक ज्वलंत उदाहरण आहे, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी सांगितले.

Swapnil S

गाझियाबाद : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय हवाई दलाने केवळ चार दिवसांत शत्रूवर विजय मिळवला. काळजीपूर्वक नियोजन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि दृढनिश्चय याद्वारे काय साध्य करता येते, याचे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे एक ज्वलंत उदाहरण आहे, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी सांगितले.

भारतीय हवाई दलाचा ९३ वा ‘हवाई दल दिन’ गाझियाबाद येथील हिंडन हवाई दल तळावर साजरा केला जात आहे. यावेळी बोलताना एअर चीफ मार्शल एपी सिंह म्हणाले, स्वदेशी शस्त्रांनी शत्रूच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ले केले. यामुळे पाकला ४ दिवसांत धूळ चारण्यात आम्हाला यश आले.

‘हवाई दल दिना’निमित्त झालेल्या कार्यक्रमात हवाई दलाच्या विमानांनी थरारक व नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर केली. विमानातून तिरंगा फडकवण्यात आला. यावर्षीच्या हवाई दल दिनाची थीम ‘सक्षम, बलवान, आत्मनिर्भर’ ही होती. हा दिवस ‘ऑपरेशन सिंदूर’च्या शूर योद्ध्यांना समर्पित करण्यात आला. यानिमित्ताने, हवाई दलाच्या धाडस आणि शौर्यासाठी ९७ शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Weather Update : नौतपाचा ताप, उष्णतेची लाट; आणखी आठवडाभर राहणार उन्हाचा कहर

दहशतवाद ही आता वैश्विक समस्या

आजचे राशिभविष्य, २५ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

चविष्ट आणि हेल्दी सोया चणा डाळ भुर्जी; मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल

Hair Care Tips : केसांसाठी वरदान ठरेल कढीपत्ता; जाणून घ्या 'हे' ५ फायदे