Operation Sindoor First Anniversary : ऑपरेशन सिंदूरचे पंतप्रधान मोदींनी केले स्मरण 
राष्ट्रीय

Operation Sindoor First Anniversary : ऑपरेशन सिंदूरचे पंतप्रधान मोदींनी केले स्मरण

'ऑपरेशन सिंदूर' या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा पराभव करण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाचा पुनरुच्चार केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर' या मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा पराभव करण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाचा पुनरुच्चार केला आहे. या दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरील आपले प्रोफाइल फोटो बदलून 'ऑपरेशन सिंदूर'चा लोगो ठेवला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय सशस्त्र दलांनी या मोहिमेदरम्यान अतुलनीय धैर्य, अचूकता आणि दृढ निर्धार यांचे दर्शन घडवले. हे भारताचे दहशतवादाविरुद्धचे खंबीर धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेप्रती असलेली अतूट बांधिलकी दर्शवते

गेल्या वर्षी ७ मे च्या पहाटे, भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले होते. २२ एप्रिल रोजी पहलगाम इथे झालेल्या त्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा बळी गेला होता. त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारताने अचूक हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले केले होते.

नेपाळमध्ये हाहाकार! महापुरात हजारो गेले वाहून, ९५ जणांचा मृत्यू, १३३ भारतीयांसह शेकडो बेपत्ता; नांदेडच्या पर्यटकांचाही समावेश

गरज असेल तरच घराबाहेर पडा; महाराष्ट्रासह २६ राज्यांना १३ तास संकटाचे, हवामान खात्याचा इशारा

नियम तोडाल तर कारवाई होणारच; मुंढेंचा इशारा; सणासुदीत भेसळयुक्त विक्रेत्यांवर FDA ची नजर, नवी नियमावली आज करणार जारी

MPSC Paper Leak: तीन अधिकाऱ्यांसह सहा जण अटकेत; अप्पर सचिव अभिजीत लेंडवे, क्लासचालकही ताब्यात

वेसावे ते भाईंदर फक्त २० मिनिटांत; कोस्टल रोड उन्नत मार्गाचे काम होणार सात टप्प्यांत; वेळेत काम पूर्ण करा - अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश