पवन खेरांच्या घरावर छापा; आसाम पोलिसांची दिल्लीत कारवाई 
राष्ट्रीय

पवन खेरांच्या घरावर छापा; आसाम पोलिसांची दिल्लीत कारवाई

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि त्यांच्या कुटुंबावर करण्यात आलेल्या आरोपांच्या संदर्भात, आसाम पोलिसांच्या एका पथकाने मंगळवारी काँग्रेस नेते पवन खेडा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकला यावेळी पोलिसांनी घराची झडती घेतली असून खेडा यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि त्यांच्या कुटुंबावर करण्यात आलेल्या आरोपांच्या संदर्भात, आसाम पोलिसांच्या एका पथकाने मंगळवारी काँग्रेस नेते पवन खेडा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकला यावेळी पोलिसांनी घराची झडती घेतली असून खेडा यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

काँग्रेस नेत्याच्या घराबाहेर आसाम पोलिसांनी सांगितले की, पवन खेडा त्यांच्या निवासस्थानी आढळले नाहीत. मात्र, घराची झडती घेण्यात आली असून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तपासणीदरम्यान काही आक्षेपार्ह साहित्य’ सापडले आहे, परंतु तपासाच्या या टप्प्यावर त्याचा तपशील उघड करता येणार नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. हा गुन्हा गुवाहाटी येथील गुन्हे शाखा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पवन खेडा सध्या कोठे आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही, मात्र लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

वादाची पार्श्वभूमी

जेव्हा पवन खेडा यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री सरमा यांच्या पत्नीकडे तीन पासपोर्ट आहेत आणि सरमा यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पत्नीच्या मालमत्तेची माहिती लपवली आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले की, काँग्रेसने त्यांच्या पत्नीवर बिनबुडाचे आणि द्वेषपूर्ण आरोप करण्यासाठी पाकिस्तानी सोशल मीडिया ग्रुपकडून मिळालेल्या ‘खोट्या माहितीचा’ वापर केला आहे.

खेरा पळून गेले- सरमा

शिवसागर : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मंगळवारी काँग्रेस नेते पवन खेरा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर, ‘हिंमत असेल तर अटक करून दाखवा’ असे आव्हान देणारे पवन खेरा आता अटकेच्या भीतीने हैदराबादला पळून गेल्याचा दावा सरमा यांनी केला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान सरमा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, खेरा यांनी पोलिसांना त्यांना अटकेचे आव्हान दिले होते, पण आता ते हैदराबादला पळून गेले आहेत.

आसाम पोलिसांचे एक पथक पवन खेरा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी चौकशीसाठी पोहोचले होते. मात्र, खेरा तिथे उपलब्ध नव्हते. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘पोलीस तिथे का गेले हे मला माहीत नाही, कारण खेरा कालच तिथून निघून गेले आहेत. कालपर्यंत ते ‘मला अटक करा’ असे ओरडत होते आणि आज जेव्हा पोलीस त्यांच्या घरी पोहोचले, तेव्हा ते पसार झाले.’

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया