राष्ट्रीय

सुरुवातीच्या काळात चुकीच्या वाटणाऱ्या योजना भविष्यात उपयुक्त ठरतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘अग्निपथ’ योजनेबाबत अनेक संघटनांकडून जोरदार आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधानांचे हे वक्तव्य लक्षणीय आहे

वृत्तसंस्था

काही योजना प्रारंभीच्या काळात चुकीच्या वाटू शकतात; पण भविष्यात त्या राष्ट्र निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अग्निपथ’बाबत थेट मत व्यक्त केले नाही. देशात ‘अग्निपथ’ योजनेबाबत अनेक संघटनांकडून जोरदार आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधानांचे हे वक्तव्य लक्षणीय आहे. भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात २८० कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या ‘मेंदू संशोधन केंद्रा’चे उद‌्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले होते.

बंगळुरू येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, सुधारणांचा रस्ता आपल्याला नवीन लक्ष्य व नवीन संकल्पाच्या पुढे घेऊन जाऊ शकतो. या योजनेचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. त्याचे उद‌्घाटन माझ्या हस्ते होत आहे ही बाब सुखद आहे. या केंद्रात मेंदू व्यवस्थापनाबाबत मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘मेंदू संशोधन केंद्रा’ला खास संशोधन केंद्र म्हणून विकसित केले असून वयानुसार मेंदू विकारावर संशोधन केले जाईल.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन