PTI
राष्ट्रीय

Kalindi Express: कालिंदी एक्स्प्रेस घसरविण्याचा डाव

लोहमार्गावर ठेवण्यात आलेल्या एलपीजी सिलिंडरला धडक दिल्यानंतर भिवानी-प्रयागराज कालिंदी एक्स्प्रेस थांबविण्यात आल्याने सोमवारी भीषण अपघात टळला, असे पोलिसांनी सांगितले.

Swapnil S

कानपूर : लोहमार्गावर ठेवण्यात आलेल्या एलपीजी सिलिंडरला धडक दिल्यानंतर भिवानी-प्रयागराज कालिंदी एक्स्प्रेस थांबविण्यात आल्याने सोमवारी भीषण अपघात टळला, असे पोलिसांनी सांगितले. इतकेच नव्हे, तर लोहमार्गावर पेट्रोलची बाटली आणि काडीपेट्याही सापडल्याने हा घातपाताचा प्रयत्न असल्याचे संकेत मिळत आहेत.

सदर एक्स्प्रेस अत्यंत वेगाने जात असताना रविवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला असून घटनेच्या तपासासाठी अनेक पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक स्वतंत्रपणे तपास करीत आहे. लोहमार्गावर एलपीजी सिलिंडर ठेवून एक्स्प्रेस रुळावरून घसरविण्याचा डाव होता, असे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी