(Photo-X/@narendramodi)
राष्ट्रीय

‘जी-२०’साठी पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेत

२०१६ मध्ये द्विपक्षीय भेट आणि त्यानंतर २०१८ आणि २०२३ मध्ये झालेल्या दोन ‘ब्रिक्स’ शिखर परिषदांनंतर मोदींचा हा दक्षिण आफ्रिकेचा चौथा अधिकृत दौरा आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी तीन दिवसांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. संध्याकाळी ६ वाजता ते दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले. जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या २० व्या ‘जी-२०’ शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जी-२०’ शिखर परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. अमेरिकेचे कोणतेही अधिकारी या परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी अनेक देशांच्या नेत्यांशी वैयक्तिक बैठका घेतील. ते ‘भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका’ देशांच्या बैठकीला देखील उपस्थित राहणार आहेत. २०१६ मध्ये द्विपक्षीय भेट आणि त्यानंतर २०१८ आणि २०२३ मध्ये झालेल्या दोन ‘ब्रिक्स’ शिखर परिषदांनंतर मोदींचा हा दक्षिण आफ्रिकेचा चौथा अधिकृत दौरा आहे.

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

मुंबईसह राज्यभरात उन्हाचा चटका; थंडीने गाशा गुंडाळला; आणखी काही दिवस उष्णतेचा इशारा

एसटीच्या 'शिवनेरी' धावणार राज्यभरात; २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेसची खरेदी

व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे घटस्फोट मंजूर होत नाही; नाशिकच्या कौटुंबिक कोर्टाचा आदेश रद्दबातल

Mumbai : फुटपाथवर यापुढे दुचाकींना नो एन्ट्री! ३८४ कोटी रुपये खर्चून रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवणार