(Photo-X/@narendramodi)
राष्ट्रीय

जगातील सर्वात उंच श्रीराम पुतळा, गोव्यात ७७ फूट उंच श्रीराम पुतळ्याचे अनावरण

दक्षिण गोव्यातील कॅनाकोना येथील श्री संस्थान गोकर्ण परतगळी जीवोत्तम मठ हा गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव परंपरेचे पहिले प्रमुख केंद्र मानले जाते. येथे पंतप्रधानांनी श्रीरामांच्या प्रतिमेसोबत मठात तयार केलेल्या ‘रामायण थीम पार्क गार्डन’चेही उद्घाटन केले.

Swapnil S

बंगळुरू/पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गोव्यातील कॅनाकोना येथील श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठात पूजा केली व भगवान रामाच्या ७७ फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. हा जगातील सर्वात उंच श्रीराम पुतळा असल्याचा दावा केला जात आहे.

दक्षिण गोव्यातील कॅनाकोना येथील श्री संस्थान गोकर्ण परतगळी जीवोत्तम मठ हा गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव परंपरेचे पहिले प्रमुख केंद्र मानले जाते. येथे पंतप्रधानांनी श्रीरामांच्या प्रतिमेसोबत मठात तयार केलेल्या ‘रामायण थीम पार्क गार्डन’चेही उद्घाटन केले.

कांस्य धातूपासून बनवलेली ७७ फूट उंच श्रीराम मूर्ती राम सुतार यांनी बनवली आहे. त्यांनीच गुजरातमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ बनवली होती. मठात तयार केलेल्या ‘रामायण थीम पार्क गार्डन’चेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले.

तत्पूर्वी, सकाळी पंतप्रधानांनी कर्नाटकात उडुपी येथे श्री कृष्ण मठात पूजाअर्चा केली व त्यांनी सुवर्ण तीर्थ मंडपाचे उद्घाटन केले आणि सोन्याचा कलश अर्पण केला. यानंतर पंतप्रधानांनी १ लाख लोकांसोबत श्रीमद्भगवद्गीतेचे पठण केले.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये