राष्ट्रीय

श्रीरामाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे महागात पडले

Swapnil S

येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत भगवान श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. अशात, भगवान रामाबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कौंधियारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शैलेंद्र कुमार कुशवाह (४३) असे आरोपीचे नाव असून तो गौरा या गावातील रहिवासी आहे.

रविवारी संध्याकाळी शैलेंद्रने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून भगवान रामाविरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर स्थानिक संतप्त झाले आणि पोस्टविरोधात कौंधियारा पोलिस ठाण्यात आंदोलन करीत शैलेंद्रवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

विश्व हिंदू परिषदेचे स्थानिक नेते शिवम मिश्रा यांच्या तक्रारीवरून शैलेंद्रविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. संबंधित कलमांतर्गत आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली असून त्याला अटक करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल