राष्ट्रीय

प्रीडेटर ड्रोन खरेदीचा करार लवकरच; अमेरिकेबरोबरील वाटाघाटी अंतिम टप्प्यात: नौदलप्रमुखांची माहिती

भारत अमेरिकेकडून प्रीडेटर प्रकारचे ३१ अत्याधुनिक लढाऊ ड्रोन विकत घेण्यास प्रयत्नशील आहे.

Swapnil S

विशाखापट्टणम : अमेरिकेकडून प्रीडेटर ड्रोन विकत घेण्याचा करार लवकरच केला जाईल. त्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी रविवारी दिली. विशाखापट्टणमजवळील समुद्रात नौदलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मिलन २०२४ या कवायती १९ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला ते पत्रकारांशी बोलत होते. या कवायतींमध्ये सुमारे ५० देशांच्या युद्धनौका सहभागी होत आहेत.

भारत अमेरिकेकडून प्रीडेटर प्रकारचे ३१ अत्याधुनिक लढाऊ ड्रोन विकत घेण्यास प्रयत्नशील आहे. त्यापैकी १५ ड्रोन नौदलासाठी आणि प्रत्येकी ८ ड्रोन लष्कर आणि हवाईदलासाठी घेतले जात आहेत. त्यासाठी साधारण ४ अब्ज डॉलर्सचा करार केला जाण्याची शक्यता आहे. या खरेदीला केंद्र सरकारच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने नुकतीच मान्यता दिली आहे. त्या संदर्भातील पत्र अमेरिकी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. अमेरिकी काँग्रेसची मान्यता मिळाल्यावर या कराराचा मार्ग मोकळा होईल. पुढील काही महिन्यांत अंतिम करार होण्याची शक्यता आहे, असे अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी सांगितले.

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

GST दर कपातीनंतर NCH ला तीन हजार तक्रारी प्राप्त; ग्राहक व्यवहार सचिवांची माहिती