राष्ट्रीय

पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन

गुजरातमधील गांधीनगर येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिरा बा यांचे आज (३० डिसेंबर) पहाटे ३.३० वाजता 100 व्या वर्षी निधन झाले

वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Hiraben Modi) यांचे निधन झाले आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे भाऊ पंकज मोदी यांनी त्यांच्या आईला मुखाग्नी दिला. गुजरातमधील गांधीनगर येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिरा बा यांचे आज (३० डिसेंबर) पहाटे ३.३० वाजता 100 व्या वर्षी निधन झाले.

हिराबेन यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव पीएम मोदींचे धाकटे भाऊ पंकज मोदी यांच्या गांधीनगर येथील घरी आणण्यात आले, जिथे पंतप्रधान मोदींनी पोहोचून त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण