फसवणाऱ्या पुरुषांना महिला ओळखून असतात - प्रियांका 
राष्ट्रीय

फसवणाऱ्या पुरुषांना महिला ओळखून असतात - प्रियांका

पंतप्रधानांचे भाषण ऐकून कोणाला असे वाटेल की भाजप हा एकच पक्ष महिलांच्या हक्कासाठी लढत आहे. पण वारंवार फसवणाऱ्या पुरुषांना महिला ओळखून असतात, अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

Swapnil S

पंतप्रधानांचे भाषण ऐकून कोणाला असे वाटेल की भाजप हा एकच पक्ष महिलांच्या हक्कासाठी लढत आहे. पण वारंवार फसवणाऱ्या पुरुषांना महिला ओळखून असतात, अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करत असून देशाच्या अखंडतेवर हल्ला करत आहे, असा आरोप गांधी यांनी केला. त्या म्हणाल्या, "एकीकडे महिला आरक्षणाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात आहेत, तर दुसरीकडे ओबीसींचे हक्क हिरावले जात आहेत. लहान राज्यांचा प्रभाव कमी करून आणि लोकशाहीच्या चिंधड्या उडवून आगामी निवडणुकीसाठी एक भक्कम सापळा रचला जात आहे."

शहा यांच्यावरही त्यांनी टीका केली. चर्चेदरम्यान अमित शहा हसत असताना प्रियांका गांधी म्हणाल्या, "गृहमंत्री हसत आहेत... त्यांनी हा संपूर्ण आराखडा तयार केला आहे. तुमची ही 'राजकीय कुटिलता' पाहून चाणक्यही चकित झाले असते. त्यांनीच हा संपूर्ण प्लॅन बनवला आहे आणि आता ते हसत आहेत... याचा अर्थ ते माझ्याशी सहमत आहेत."

निवडणुका सुरू असताना संसदेचे अधिवेशन बोलावणे, सर्वपक्षीय बैठक न घेणे आणि विधेयकाचा मसुदा केवळ एक दिवस आधी देणे, जेणेकरून विरोधकांना त्यावर चर्चा करायला वेळ मिळू नये, ही सरकारची रणनीती आहे, असे त्या म्हणाल्या.

महिला आरक्षणाचा इतिहास आणि काँग्रेसची भूमिका

महिला आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्या भाजपवर टीका करताना प्रियांका गांधी म्हणाल्या, "कोणतीही महिला हे सांगू शकते की, तिला वारंवार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषांना ती चटकन ओळखते."

यावेळी त्यांनी महिला आरक्षणाच्या इतिहासाचाही उल्लेख केला. १९२८ मध्ये मोतीलाल नेहरू यांनी नेहरू अहवालात १९ मूलभूत हक्कांची यादी सादर केली होती. १९३१ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखालील कराची अधिवेशनात महिलांच्या समान अधिकारांचा ठराव मंजूर झाला.'एक नागरिक, एक मत, एक मूल्य' या तत्त्वामुळे भारतीय महिलांना पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार मिळाला, जो अमेरिकेसारख्या देशात मिळायला १५० वर्षे लागली, असे त्यांनी नमूद केले.

शेवटी प्रियांका म्हणाल्या, "राजकारणात चतुर असणे ही एक गोष्ट आहे, पण सत्तेच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा देशहित समोर ठेवून निर्णय घेणे जास्त महत्त्वाचे आहे."

सूर्य कोपतोय! राज्यात आज उष्णतेची तीव्र लाट; २३ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान

राज्यात आणखी ८ स्वयंचलित वाहन चाचणी मार्ग; RTOमध्ये व्हिडीओ आधारित मूल्यांकन यंत्रणा

‘नारीशक्ती’ पणाला! ‘आरक्षण’, ‘सीमांकन’ विधेयके संसदेत सादर; आज मतदान, दक्षिणेवर अन्याय नाही- शहा, द्रमुक न्यायालयात जाणार

नाशिक टीसीएस प्रकरण: निदा खानच मुख्य सूत्रधार; २० दिवसांपासून फरार, सात जणांना अटक, तपासात धक्कादायक माहिती