राष्ट्रीय

मान्सून लांबणीवर ?देशभरात पसरली उष्णतेची लाट

वृत्तसंस्था

देशात मान्सून आठ दिवस आधीच दाखल झाल्याने घामांच्या धारांपासून दिलासा मिळणार, अशी आशा निर्माण झाली होती; मात्र गेल्या आठ दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवार परिसरातच अडकल्याने देशभरात मान्सूनपूर्व पावसाअभावी उष्णतेची लाट पसरली आहे. येत्या चार-पाच दिवसांपर्यंत मान्सून वेगाने पुढे सरसावण्याचीही शक्यता कमी असल्याने देशाच्या मध्य, उत्तर आणि पश्चिम राज्यांत काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे.

पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, झारखंडमध्ये बुधवारी उष्णतेची लाट होती. समुद्रात कोणत्याही प्रकारचे वादळ किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाही. यामुळे मान्सूनचा वेग मंदावला आहे. दुसरीकडे, देशात मान्सूनपूर्व पाऊसही आतापर्यंत खूप कमी झाला आहे. ७ जूनपर्यंत भारतात मान्सूनपूर्व पाऊस ३७ टक्के कमी झाला आहे. वायव्य प्रांताचा विचार केल्यास मान्सूनपूर्व पाऊस आतापर्यंत ९४ टक्के कमी झाला आहे. याच कारणामुळे उत्तर आणि मध्य भारतात पुन्हा उष्णतेची लाट सुरू झाली असून पुढील तीन दिवस त्याचा प्रभाव राहू शकतो.

मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार

राज्यातील १२ जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भातील उष्णतेची लाट आता ओसरणार असून चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज नागपूर हवामान वेधशाळेने वर्तवला आहे. कोल्हापूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, नाशिक, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भात उष्णतेची लाट ओसरणार असली, तरी तब्बल नऊ शहरांतील तापमान हे सध्या चाळिशीपार गेले आहे.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर