राष्ट्रीय

लोकसभेत महागाईविरोधात आंदोलन : काँग्रेसच्या चार खासदारांवर निलंबनाची कारवाई

महागाईविरोधात सभागृहात फलक घेऊन निदर्शने केल्याबद्दल काँग्रेसच्या चार खासदारांना लोकसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

प्रतिनिधी

महागाईविरोधात सभागृहात फलक घेऊन निदर्शने केल्याबद्दल काँग्रेसच्या चार खासदारांना लोकसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वी आंदोलन न करण्याचा करण्याचा इशारा दिला होता. आंदोलन करायचं असेल तर त्यांनी सभागृहाच्या बाहेर आंदोलन करावं, असंही ते म्हणाले होते.

पण काँग्रेसच्या खासदारांनी महागाईविरोधातील आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. त्यामुळे काँग्रेसच्या ४ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिणामी त्यांना आता संपूर्ण अधिवेशनासाठी मुकावं लागणार आहे. मणिकम टागोर, जोथिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन असं निलंबित करण्यात आलेल्या काँग्रेस खासदारांची नावं आहेत. निलंबनाची कारवाई केल्यानंतर चारही खासदारांनी संसद भवनासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात यावं आणि महागाई व खाद्यपदार्थांवर अलीकडेच वाढवलेल्या जीएसटीबाबत आपलं मत व्यक्त करावं” अशी मागणी आंदोलनकर्त्या काँग्रेस खासदारांनी केली आहे. तसेच १८ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून महागाईबाबत चर्चा करावी, अशी मागणीही विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.

भारतातील ऑटो कंपोनंट उद्योग १० टक्के वेगाने वाढणार; देशांतर्गत मागणी, वाढत्या निर्यातीमुळे चालू आर्थिक वर्षात क्षेत्र वाढण्याची उद्योगाला अपेक्षा

Mumbai : रिव्हर्स घेताना बेस्ट बसची पादचाऱ्याला धडक; नियंत्रण सुटल्याने पार्क केलेल्या ३ वाहनांचे नुकसान, Video

५०० रुपयांऐवजी घेतले ५० युरो! आग्र्यात फ्रेंच पर्यटकांची टॅक्सीचालकाकडून फसवणूक, पोलिसांनी पैसे परत मिळवून दिले, Video

वारीसाठी पुणे पोलिसांची 'हायटेक' सुरक्षा व्यवस्था; एआय, ड्रोन, चेहरा ओळखणारी यंत्रणा, जीपीएस, सीसीटीव्हीसह आठ हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा

जलमय वसईत नागरिकांना ट्रॅक्टरचा आधार; चालकांकडून माफक दरात प्रवाशांची वाहतूक