राष्ट्रीय

नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांना शिक्षा;कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका : उच्च न्यायालयात धाव

बांगलादेशच्या न्यायालयाने कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून डॉ. मोहम्मद युनूस यांना सहा महिन्यांची सजा सुनावली आहे

Swapnil S

ढाका : ग्रामीण बँकेचे संस्थापक व सूक्ष्म वित्त पुरवठा क्षेत्रात लक्षणीय कामगिरीसाठी नोबल पुरस्कार पटकावणाऱ्या मोहम्मद युनूस या ८३ वर्षांच्या बांगलादेशी अर्थतज्ज्ञास तेथील न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

बांगलादेशच्या न्यायालयाने कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून डॉ. मोहम्मद युनूस यांना सहा महिन्यांची सजा सुनावली आहे. डॉ. युनूस यांच्या पाठिराख्यांनी मात्र ही निवडणूक जवळ आल्यामुळे केलेली राजकीय हेतूने प्रेरित खेळी आहे, असा आरोप केला आहे. २००६ साली डॉ. युनूस यांच्या गरिबीविरोधातील चळवळीला नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. १९८३ साली स्थापन केलेल्या ग्रामीण बँकेच्या माध्यमातून त्यांनी सूक्ष्म वित्तपुरवठा करून गरीबांच्या जीवनात क्रांती घडवून आणली होती. युनूस आणि त्यांचे ग्रामीण टेलिकॉममधील तीन सहकारी यांनी मिळून कामगार कायद्याचे उल्लंघन केले आणि त्यांनीच स्थापन केलेल्या कंपनीत कामगार कल्याण निधी स्थापन केला नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बांगलादेशातील तिसऱ्या कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश शेख मरीना सुल्ताना यांनी युनूस व त्यांचे तीन सहकाऱ्यांना या प्रकरणी सहा महिन्यांच्या साध्या तुरुंगवासाची सजा सुनावली आहे. तसेच प्रत्येकाला सुमारे २० हजार रुपये दंड ठोठावला आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव