राष्ट्रीय

अहिंदूंना मंदिरात प्रवेश नसल्याच्या पाट्या लावा; मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल

Swapnil S

चेन्नई : तामिळनाडूतील हिंदू मंदिरात अहिंदूंना प्रवेश नाही, अशा आशयाचे फलक लावण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने हिंदू व धर्मदाय यंत्रणेला दिले आहेत.

दक्षिणेतील अनेक मंदिरांमध्ये कोडिमारम (ध्वजस्तंभ) उभारलेला असतो. या ध्वजस्तंभाच्या आत अहिंदूंनी प्रवेश करू नये, असा फलक लावण्यात यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. तामिळनाडूच्या डिंडिगुल जिल्ह्यातील पलानी दंडयुथापानी स्वामी मंदिराने यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्ते आणि पलानी मंदिराच्या बोर्डवरील सदस्य सेंथिल कुमार यांनी याचिकेत म्हटले होते की, प्रसिद्ध पलानी मुरुगन मंदिरात रोज हजारो लोक येतात. यात अहिंदूंचीही मोठी संख्या असते. मात्र त्यांच्या वागणुकीमुळे हिंदू धार्मिक भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात यावे.

हा निकाल देत असताना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एस. श्रीमती म्हणाल्या की, जर अहिंदू मोठ्या संख्येने मंदिर परिसरात येत असतील तर मंदिर प्रशासनाने त्याची खातरजमा करावी. मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये सर्व भाविक आहेत का? त्यांची श्रद्धा आहे का? ते हिंदू धर्मातील चालीरीती आणि परंपरा जपत आहेत का? आणि मंदिराने ठरविलेला पोषाख त्यांनी परिधान केलेला आहे का? हे पाहण्याची जबाबदारी मंदिर प्रशासनाची आहे. जर अहिंदूंना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर त्यांना मंदिराच्या नियमांचे पालन करावे लागले आणि मंदिर प्रशासनाच्या नोंदवहीत त्यांच्या प्रवेशाची नोंद करावी लागेल, असेही उच्च न्यायालयाने म्हटले. पलानी दंडयुथापानी स्वामी मंदिराने बिगर हिंदूंनी मंदिरात प्रवेश करू नये, असा फलक लावला होता. मात्र काही काळानंतर हा फलक इथून हटविण्यात आला. त्यासाठी मंदिर प्रशासनाने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर आता पुन्हा एकदा फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल