'क्यूएस रँकिंग्ज'मध्ये भारतातील शैक्षणिक संस्थांची घसरण; IIT दिल्ली देशात अव्वल 
राष्ट्रीय

'क्यूएस रँकिंग्ज'मध्ये भारतातील शैक्षणिक संस्थांची घसरण; IIT दिल्ली देशात अव्वल

शैक्षणिक संस्थांची जागतिक क्रमवारी ठरविणारी ‘क्यूएस रँकिंग्ज’ मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये यंदा आयआयटी दिल्ली आणि मुंबईने पहिल्या १०० संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : शैक्षणिक संस्थांची जागतिक क्रमवारी ठरविणारी ‘क्यूएस रँकिंग्ज’ मंगळवारी जाहीर करण्यात आली. हाँगकाँग विद्यापीठाने यावर्षी पेकिंग युनिव्हर्सिटीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. यंदा आशियाई विद्यापीठांच्या अव्वल १०० संस्थांच्या यादीत भारतातील सात शैक्षणिक संस्थांनी स्थान मिळवले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील प्रमुख संस्थांच्या विशेषतः आयआयटींच्या क्रमवारीमध्ये मोठी घसरण झाली आहे. यंदा आयआयटी दिल्ली आणि मुंबईने पहिल्या १०० संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे.

लंडनमधील ‘क्वाक्वेरेली सायमंड्स’ने (क्यूएस) जाहीर केलेल्या आशियाई विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये अव्वल १०० संस्थांच्या यादीत सात भारतीय संस्थांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये आयआयटी दिल्लीने सलग पाचव्या वर्षी भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक कायम ठेवला आहे.

यावर्षी १,५०० हून अधिक संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले, ज्यात ५५० हून अधिक नवीन प्रवेशिका समाविष्ट आहेत. या यादीत सर्वाधिक विद्यापीठे चीनमधील (३९५) आहेत, त्यानंतर भारत (२९४), जपान (१४६) आणि दक्षिण कोरिया (१०३) आहेत. यावर्षी हाँगकाँगने सर्वोत्तम कामगिरी केली, तेथील पाच विद्यापीठे टॉप १० मध्ये स्थान मिळवून आहेत.

भारतातील एकही विद्यापीठ ‘टॉप ५०’मध्ये नाही

आशियातील पहिल्या ५० विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. आयआयटी दिल्ली ५९ व्या क्रमांकावर आहे, तर आयआयएससी बंगळुरू ६४ व्या क्रमांकावर आहे.

मुख्यमंत्रीपद कायमस्वरूपी नसते! भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा भाजप नेतृत्वाला घरचा आहेर

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण : 'पॉवर ऑफ ॲटर्नी'वर पार्थ पवार, तेजवानीच्या सह्या; अंजली दमानिया यांनी सादर केले दस्तावेज

पवार कुटुंबाला दिलासा; लवासाप्रकरणी CBI चौकशीची मागणी हायकोर्टाने फेटाळली

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण : राहुल, सोनियांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस

काय सांगता! पास्ता बनवणं कठीण वाटतंय? 'ही' रेसिपी ट्राय करा, १५ मिनिटांत होईल तयार