Photo : X (@VPIndia)
राष्ट्रीय

राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांना शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. लाल कुर्ता परिधान करून आलेल्या राधाकृष्णन यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली.

Swapnil S

नवी दिल्ली : देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांना शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. लाल कुर्ता परिधान करून आलेल्या राधाकृष्णन यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पद सोडल्यानंतर जगदीप धनखड पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसले. त्यामुळे सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर होत्या.

दरम्यान, शुभमुहूर्त पाहून राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आल्याचे ‘एनडीए’च्या सदस्यांचे म्हणणे आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, झारखंडचे संतोष गंगवार, चंदिगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया हे देखील यावेळी उपस्थित होते. राधाकृष्णन यांना ९ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत एकूण ४५२ मते मिळाली, तर विरोधी उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना फक्त ३०० मते मिळाली.

धनखड यांची उपस्थिती

उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड सार्वजनिक ठिकाणी दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांच्याशिवाय माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि हमीद अन्सारी यांनीही शपथविधीला हजेरी लावली. राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठेही दिसले नसल्याने विरोधी पक्षाकडून सातत्याने ते कुठे आहेत आणि कसे आहेत, याबद्दल प्रश्न विचारले जात होते.

धनखड यांच्या उपस्थितीने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. धनखड हे शपथविधी समारंभात पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्या शेजारी व्यंकय्या नायडू आणि हमीद अन्सारी बसलेले दिसले. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, हरयाणाचे नायबसिंह सैनी आणि उत्तराखंडचे पुष्करसिंह धामी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्रीही या समारंभात सहभागी झाले होते.

''तेव्हाच थांबायला हवं होतं''; प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी, नाराजीचे कारण समोर

"BCCI च्या कुटुंबाचं कोणी मेलं नाही"; भारत-पाक सामन्यावर भडकली पहलगाम हल्ल्यातील पिडीतेची पत्नी; क्रिकेटर, स्पॉन्सर्सना घेतलं धारेवर

रक्त व क्रिकेट एकत्र कसे असू शकते? भारत-पाकिस्तान सामन्यावरून आदित्य यांची टीका

संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी हवी; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; स्वच्छ हवा मिळणे हा सर्व नागरिकांचा हक्क

दिल्लीतील अटक दहशतवाद्यांचे उल्हासनगर कनेक्शन; नेवाळी परिसरात नागरिकांमध्ये खळबळ