१४ कोटी मतदार अवैध, मग निवडणुका कशा वैध? राहुल गांधी यांचा सवाल X|INCIndia
राष्ट्रीय

१४ कोटी मतदार अवैध, मग निवडणुका कशा वैध? राहुल गांधी यांचा सवाल

भाजपच्या राजवटीत भारत देश आता लोकशाहीवादी राहिलेला नाही, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. निवडणूक आयोगाने १४ कोटी मतदारांना अवैध घोषित केले असताना निवडणुका वैध कशा असू शकतात, असा सवाल त्यांनी केला.

Swapnil S

हैदराबाद : भाजपच्या राजवटीत भारत देश आता लोकशाहीवादी राहिलेला नाही, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. निवडणूक आयोगाने १४ कोटी मतदारांना अवैध घोषित केले असताना निवडणुका वैध कशा असू शकतात, असा सवाल त्यांनी केला.

हैदराबाद येथे तेलंगणा सरकारने आयोजित केलेल्या 'भारत समिट'मध्ये राहुल गांधी बोलत होते. भारतात २०१४ मध्येच लोकशाही नष्ट झाल्याचे काँग्रेसच्या निदर्शनास आले आहे. मात्र जागतिक लोकशाही चळवळीसाठी भारतात लोकशाही टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र २०१४ मध्ये राजकीय व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर पैसा ओतून आणि पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या प्रचाराद्वारे एक नवे निवडणूक पर्व सुरू झाले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. या परिषदेला उपस्थित राहू शकलेल्या परदेशी प्रतिनिधींना केंद्र सरकारने रोखल्याचे सांगत त्यांनी जाहीर दिलगीरी व्यक्त केली.

भाजप-संघाची विचारधारा मजुरांना वेठबिगार बनवणारी

तेलंगणा सरकारने गिग कामगारांसाठी लागू केलेल्या कल्याणकारी कायद्याचे श्रेय कामगारांनाच दिले. गिग कामगारांना अर्थव्यवस्थेचा पाया आणि प्रगतीचे भागीदार असे संबोधत राहुल गांदी म्हणाले, भाजप-आरएसएसची विचारधारा 'अदानी, अंबानी'सारख्या मोठ्या भांडवलदारांना फायदा पोहोचवणारी आणि कामगारांना वेठबिगार बनवणारी आहे.

कामगार देशाचा पाया

कामगारांना २४ तास राबवून त्यांच्या श्रमाचा लाभ मोजक्या करोडपतींना देण्याचा भाजप-आरएसएसचा हेतू आहे. तर कामगारांना देशाचा पाया मानणे हीच काँग्रेसची विचारसरणी आहे, राहुल गांधी यांनी नमूद केले.

दरम्यान, तेलंगणा सरकारने मार्च महिन्यात 'तेलंगणा प्लॅटफॉर्म बेस्ड गिग वर्कर्स (रुपये ५,०००, सामाजिक सुरक्षा आणि कल्याण) विधेयक, २०२६' मंजूर केले आहे, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IND vs NZ 5th ODI: भारताच्या फलंदाजांचा कस; न्यूझीलंडविरुद्ध आज निर्णायक पाचवा एकदिवसीय सामना

नवा शैक्षणिक वादंग; खासगी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कक्षेत? विरोधकांचा आक्षेप, सत्ताधारीही अस्वस्थ

Ind vs Pak U19 Final: आशियावर भारताचेच वर्चस्व; थरारक लढतीत पाकिस्तानवर १ गडी राखून सरशी, मोहित ठरला नायक

आजचे राशिभविष्य, १५ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

पिझ्झा बेसची गरजच नाही; साध्या पावापासून १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला मिनी पिझ्झा, मुले होतील खुश