राहुल गांधी  (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

राहुल गांधींविरुद्ध FIR दाखल करण्याचा आदेश; दुहेरी नागरिकत्व प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय

दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्या. सुभाष विद्यार्थी यांनी सुनावणीदरम्यान हे आदेश दिले आहेत.

Swapnil S

अलाहाबाद : दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्या. सुभाष विद्यार्थी यांनी सुनावणीदरम्यान हे आदेश दिले आहेत.

कोर्टाने म्हटले आहे की, या प्रकरणात तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई होईल. राहुल गांधी यांच्यावर दुहेरी नागरिकत्वप्रकरणी आरोप करण्यात आले असून, या मुद्यावरुन हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. सुनावणीनंतर कोर्टाने एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने आदेश दिला की, राहुल गांधी यांच्यावर दुहेरी नागरिकत्वाचा होत असलेल्या आरोपासंदर्भात चौकशी व्हायला हवी. कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला निर्देश दिले की, त्यांनी स्वत: तपास करावा किंवा हे प्रकरण सेंट्रल एजन्सीला सोपवून तपास करावा.

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : एनटीसी गिरणी कामगारांचा आत्महत्या करण्याचा इशारा; कामगारांना पगार व पेन्शनची प्रतीक्षा

Mumbai : अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; साकीनाका, पवईत 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत एल विभागाची कारवाई

यंदा व्याजदर वाढ? वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँक पतधोरणात बदल करणार

ICC World Cup 2027 : खेळाडूंच्या दुखापती, व्यस्त वेळापत्रकामुळे सर्वोत्तम संघ निवडणे कठीण - गिल