राहुल गांधींना लोकसभेची नोटीस (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

राहुल गांधींना लोकसभेची नोटीस

लोकसभेने भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि संजय जयस्वाल यांच्या तक्रारींच्या आधारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. Rahul Gandhi

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभेने भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि संजय जयस्वाल यांच्या तक्रारींच्या आधारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. या दोन्ही खासदारांनी अँटी-पेपर लीक बिलावरील चर्चेत राहुल गांधींनी अमित शहांविरोधात केलेली टिप्पणी असंसदीय असल्याचा आरोप केला आहे. राहुल यांना २८ ऑगस्टपर्यंत आपले उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

राहुल यांनी २९ जुलै रोजी बिलावरील चर्चेत 'इडियट' आणि 'अंधभक्त' यासारख्या शब्दांचा वापर केला होता. त्यानंतर, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले होते.

आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल नियमांनुसार कारवाईची मागणी राहुल यांनी 'अंधभक्त' आणि 'इडियट' हे शब्द उच्चारल्यावर रिजिजू यांनी आक्षेप घेतला होता. तर संसदेची प्रतिष्ठा राखण्यासाठी कारवाई आवश्यक असल्याचे मत जयस्वाल यांनी व्यक्त केले होते. भाजपचे लोकसभेतील मुख्य व्हीप संजय जयस्वाल यांनी X वर पत्र शेअर केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अमित शहांविरोधात राहुल गांधींच्या आक्षेपार्ह टिप्पणींबद्दल त्यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. या टिप्पणींमुळे अमित शहा यांची खासदार म्हणून प्रतिष्ठा आणि संसदेची मर्यादा यावर विपरित परिणाम झाला. जयस्वाल यांनी २९ जुलै रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल यांच्या विरोधात नियमांनुसार योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ३७ हजार फेरीवाले 'नॉट रिचेबल'; QR कोड आधारित ओळखपत्रासाठी ३१ ऑगस्ट अखेरची तारीख

Mumbai : चणे-फुटाण्याच्या प्रसादात 'ऑरामाईन'चा वापर? कर्करोग, किडनी निकामी होण्याचा धोका; नगरसेवकाचे महापौरांना पत्र

जयगड बंदरातील जहाजातून LPG गॅसचा तातडीने उपसा करा; उच्च न्यायालयाचे सरकारी यंत्रणांना आदेश

Mumbai : मोनोरेल सप्टेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता; महालक्ष्मी ट्रॅव्हलेटर स्कायवॉकही खुला होणार

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; ठाणे-कल्याणसह पनवेल-वाशी मार्गावर लोकल सेवांवर परिणाम