भाजप, आरएसएस असभ्य - राहुल गांधी  
राष्ट्रीय

भाजप, आरएसएस असभ्य - राहुल गांधी

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हे असभ्य, लोभी, जातीवादी आणि पुरुषप्रधान मानसिकतेचे आहेत. त्यांना भारतीय आध्यात्मिक व धार्मिक परंपरांबद्दल अजिबात समज नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) हे असभ्य, लोभी, जातीवादी आणि पुरुषप्रधान मानसिकतेचे आहेत. त्यांना भारतीय आध्यात्मिक व धार्मिक परंपरांबद्दल अजिबात समज नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी केली. भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे एकरूप दर्शविणाऱ्या ‘अर्धनारीश्वर’ शिल्पाचे छायाचित्रही त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केले आहे.

राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या बिलाँगिंग : ए जर्नी ऑप लव्ह’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी त्यांनी ‘जेवताना ममा पप्पांच्या मांडीवर बसायची’ या विधानावरून काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी भाजप-आरएसएसवर तीक्ष्ण शब्दांत टीका केली.

भारतीय आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरांचा आपण जितका सखोल अभ्यास करतो, तितकीच एकेक गोष्ट अधिक स्पष्ट होत जाते, असे राहुल गांधी यांनी समाज माध्यम खात्यावरीस पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यासोबत त्यांनी एलिफंटा लेण्यांमधील भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे एकरूप रूप दर्शविणाऱ्या अर्धनारीश्वर शिल्पाचे छायाचित्रही प्रसारित केले आहे. अर्धनारीश्वर हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे एकत्रित रूप असून, त्यात अर्धे पुरुष रूप आणि अर्धे स्त्री-रूप असे दर्शविले जाते.

गेल्या मंगळवारीही राहुल गांधी यांनी टीकेला उत्तर देताना, भाजप आणि आरएसएस समर्थकांच्या मनात भीती, राग आणि द्वेषाचे जळमट तयार झाले असून त्यामुळे त्यांना प्रेम व्यक्त करता येत नसल्याचे म्हटले होते. त्यावेळी त्यांनी देवी पार्वती भगवान शिव यांच्या मांडीवर बसल्याचे दर्शवणाऱ्या १२व्या शतकातील मंदिरातील शिल्पाचे छायाचित्रही पोस्ट केले होते. ‘एक खरा हिंदू म्हणून त्यांना या जळमटातून मुक्त करणे माझे कर्तव्य आहे, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या आयुष्यात प्रेम आणि आपलेपणाचा अद्भुत आनंद अनुभवता येईल. सत्यम शिवम सुंदरम्,’ असे त्यांनी म्हटले होते.

प्रेम लपविण्याची गरज नाही, आपुलकी ही तुमची दुर्बलता नाही आणि समानतेची सुरुवात आपल्या जोडीदाराला समान व्यक्ती म्हणून वागवण्यापासून होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत काँग्रेसने राहुल गांधींच्या वक्तव्याचे समर्थन केले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोयनेचे पाणी आता मुंबईकडे वळवणार

महाराष्ट्र साहित्य परिषदेत वादंग; नांदी निधीचा हिशेब, घटनाभंग, अविश्वास ठराव कारणीभूत

पुस्तक फाडणे अमान्य; आशिष शेलार यांचा शिंदेसेनेला अप्रत्यक्ष टोला

Mumbai : 'हरितवारी जलतिरी' प्रकल्प अंधारात; सायकल ट्रॅक, पदपथांवरील बत्तीगुल

एकाच कुटुंबातील ९ ठार, धुळ्यातील भाविकांवर काळाचा घाला; राजस्थानात भीषण अपघात, मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश; ८ जखमी