राहुल गांधी यांचे संग्रहित छायाचित्र एक्स @RahulGandhi
राष्ट्रीय

मतचोरीचे स्फोटक पुरावे देणार - राहुल गांधी

देशात मते चोरून सरकारे बनवली जात आहेत, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा आपल्या रायबरेली दौऱ्यात केला. याबाबतचे स्फोटक पुरावे आपण लवकरच जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Swapnil S

रायबरेली : देशात मते चोरून सरकारे बनवली जात आहेत, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा आपल्या रायबरेली दौऱ्यात केला. याबाबतचे स्फोटक पुरावे आपण लवकरच जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कथित मतचोरीच्या पुराव्यांमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांनी रायबरेली दौऱ्यादरम्यान सत्ताधारी भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे. देशभरात ‘वोट चोर, गद्दी छोड’ अशी घोषणा घुमत आहे. आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे की, मत चोरून सरकारे स्थापन केली जात आहेत, असा गंभीर आरोप करून त्यांनी मतचोरीविरोधात पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

...तेव्हा सर्व साफ होईल

भाजपवर हल्ला चढविताना राहुल म्हणाले की, भाजपचे लोक चिडत आहेत. पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, उत्तेजित होऊ नका. कारण जेव्हा हायड्रोजन बॉम्ब फुटेल, तेव्हा सर्व काही साफ होऊन जाईल. या मतचोरीबाबतचे ठोस पुरावे लवकरच जनतेसमोर मांडले जातील. यामुळे देशभरातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.

रायबरेलीच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी प्रजापती समाजाच्या परिषदेलाही संबोधित केले. यावेळी त्यांनी थेट भाजप आणि आरएसएसवर टीकास्त्र डागले. ते म्हणाले, 'देशातील ९० टक्के जनता ही ओबीसी, दलित आणि आदिवासी समाजाची आहे. पण भाजप-आरएसएस यांना ही जनता कधीच पुढे जाऊ नये, असेच ते इच्छितात.'

राहुल गांधी यांनी पुढे आरोप केला की, 'हे लोक अशी व्यवस्था निर्माण करू इच्छितात की, दलित गरीबीतच राहावेत आणि मोठे उद्योगपती जसे अंबानी आहेत तसेच वरच्या स्थानावर राहावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी असल्याचा दावा करतात, मात्र जातीय जनगणनेबाबत एकही शब्द उच्चारत नाहीत.' मतचोरीचे पुरावे समोर आणण्याच्या राहुल गांधींच्या घोषणेमुळे राजकारण कोणते वळण घेणार हे पाहावे लागणार आहे.

‘वोट चोर, गद्दी छोड’

राहुल गांधींनी देशवासीयांना संबोधून म्हटले की, आम्ही लवकरच तुमच्यासमोर डायनॅमिक एक्सप्लोसिव्ह पुरावे (स्फोटक पुरावे) ठेवणार आहोत. देशभरात 'वोट चोर, गद्दी छोड' असा नारा घुमत आहे.

हीच खरी परिस्थिती आहे की, सरकारे लोकशाही मार्गाने नव्हे तर मतचोरी करून निर्माण होत आहेत. त्यामुळे तरुणांनो, आमचे काळजीपूर्वक ऐका. आम्ही तुम्हाला हमीसह पुरावे देणार आहोत, असे ते म्हणाले.

Mumbai : उद्यापासून एलफिन्स्टन पूल बंद; दक्षिण मुंबईत होणार वाहतूककोंडी; अनेक मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल

लहान समाजात जन्मलो हे पाप आहे का?भुजबळांचा उद्विग्न सवाल; लातूरच्या कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट, मुंडेही उपस्थित

नेपाळ : आंदोलकांनी आग लावलेल्या हॉटेलमधून पळण्याच्या प्रयत्नात भारतीय महिलेचा मृत्यू

Ulhasnagar : सेंच्युरी कंपनीच्या कँटीनमध्ये बनावट कूपन घोटाळा उघडकीस; प्रिंटिंग प्रेसवर पोलिसांची कारवाई

धुळ्यात माजी स्थायी सभापतीच्या मुलाची आत्महत्या; वाढदिवसानंतर दोनच दिवसात उचललं टोकाचं पाऊल