राष्ट्रीय

‘आरएसी बर्थ’ मिळाल्यास रेल्वेने अंशत: भाडे परत करावे; संसदीय समितीची सूचना

‘आरएसी बर्थ’ श्रेणीअंतर्गत बुक केलेल्या तिकिटांसाठी प्रवाशाकडून पूर्ण भाडे घेणे योग्य नाही. रेल्वे मंत्रालयाने अशा प्रवाशाला अंशतः भाडे परत करण्यासाठी नियम तयार करावेत, अशी सूचना संसदीय समितीने रेल्वे मंत्रालयाला केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : ‘आरएसी बर्थ’ श्रेणीअंतर्गत बुक केलेल्या तिकिटांसाठी प्रवाशाकडून पूर्ण भाडे घेणे योग्य नाही. रेल्वे मंत्रालयाने अशा प्रवाशाला अंशतः भाडे परत करण्यासाठी नियम तयार करावेत, अशी सूचना संसदीय समितीने रेल्वे मंत्रालयाला केली आहे.

सध्याच्या नियमांनुसार, रेल्वे ‘आरएसी’ श्रेणीअंतर्गत गाड्यांमध्ये बर्थ बुक करण्यासाठी प्रवाशाकडून पूर्ण भाडे घेते. तथापि, प्रवासी आरएसी श्रेणीत राहू शकतो आणि बर्थ दुसऱ्या ‘आरएसी’ प्रवाशासोबत सामायिक करू शकतो. मात्र, दोन्ही प्रवासी रेल्वेला पूर्ण भाडे देतात.

संसदीय लेखा समितीने बुधवारी संसदेत सादर केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘आरएसी’ अंतर्गत तिकिटांसाठी पूर्ण भाडे घेणे योग्य नाही. यामध्ये चार्ट तयार झाल्यानंतरही तिकीटधारकाला बर्थची सुविधा नसतानाही ‘आरएसी’ श्रेणीत रहावे लागते. त्यामुळे समितीने रेल्वेला अशा प्रवाशांना अंशतः भाडे परत करण्यास आणि यासंदर्भात उचललेल्या पावलांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

सुपरफास्ट गाड्यांच्या वर्गीकरण नियमांमध्ये बदल आवश्यक

सुपरफास्ट गाड्यांचे वर्गीकरण करण्यासाठी समितीने म्हटले की, यासाठी ५५ किमी प्रति तास वेगाचा निकष खूप कमी आहे. समितीने सांगितले की, २००७ पासून सुपरफास्ट गाड्यांच्या वर्गीकरणाच्या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सध्या ५५ किमी/तास वेगाच्या गाड्या सुपरफास्ट मानल्या जातात.

भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी केंद्र सरकारचे नवे नियम; व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी नोंदणी आवश्यक, जाणून घ्या सविस्तर

'फी भरली नाही' म्हणून मित्र-मैत्रिणींसमोर अपमान; १७ वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, मृत्यूपूर्वीचा Video व्हायरल, शिक्षकांविरोधात गुन्हा

Mumbai : सीएसएमटी ते बोरिवली प्रवास होणार सोपा! हार्बर लाईन विस्तार प्रकल्पाला वेग; पश्चिम रेल्वेकडून ८६.५१ कोटींची निविदा

Thane Traffic Update : नौपाडा परिसरातील वाहतुकीत मोठे बदल; ३० जूनपर्यंत नवे नियम लागू

Monsoon Travel Alert : मुंबईहून गोवा-केरळ ट्रिप प्लॅन करताय? कोकण रेल्वेने बदलले अनेक गाड्यांचे वेळापत्रक; प्रवासापूर्वी 'हे' नक्की वाचा