१९ लाखांत MBBS पदवीची खरेदी; बोगस डॉक्टरसह चौघांना अटक 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

१९ लाखांत MBBS पदवीची खरेदी; बोगस डॉक्टरसह चौघांना अटक

लाखो रुपये घेऊन बनावट वैद्यकीय पदव्या पुरवणाऱ्या आणि त्या खऱ्या वाटाव्यात यासाठी विद्यापीठांच्या संकेतस्थळावर अपलोड करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसओजी) पर्दाफाश केला आहे.

Swapnil S

जयपूर : लाखो रुपये घेऊन बनावट वैद्यकीय पदव्या पुरवणाऱ्या आणि त्या खऱ्या वाटाव्यात यासाठी विद्यापीठांच्या संकेतस्थळावर अपलोड करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसओजी) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत केवळ अकरावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एका बोगस डॉक्टरसह चौघांना अटक करण्यात आली असून, या आरोपीने बनावट पदव्यांच्या आधारे दिल्लीतील नामवंत रुग्णालयांत डॉक्टर म्हणून काम केल्याचे उघड झाले आहे.

राजस्थानमधील करौली येथील रहिवासी असलेल्या राम किशोर महावर असे अटक केलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याने सुमारे १९.५० लाख रुपये खर्च करून एमबीबीएस, एमडी (स्त्रीरोगशास्त्र) आणि डीएमआरडी या बनावट पदव्या मिळवल्या होत्या. या आधारे वैद्यकीय परिषदेची नोंदणी मिळवून त्याने दिल्लीतील रुग्णालयांत कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काम केले, तसेच विविध रुग्णालये आणि निदान केंद्रांमध्ये ऑन-कॉल सोनोग्राफीही केल्याचे उघड झाले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सिंधुदुर्ग-मुंबई विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांना बसने मोपा विमानतळावर हलविले; विमानाचे दोनदा उड्डाण रद्द

दुष्काळाविरुद्ध लोकचळवळ उभारा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन - 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेचा शुभारंभ

Kosi Express Viral Video : ट्रेनला आग लागल्याची अफवा अन् प्रवाशांची घाबरगुंडी! महिला-मुलांसह ट्रेनमधून मारल्या उड्या

BMC शाळांतील विद्यार्थी जाणार सिंगापूरला; वैज्ञानिक क्षेत्रातील अनुभव घेत भरारी घेणार; ३५ विद्यार्थी अन् पाच शिक्षकांचा सहलीत समावेश

मुंबई विमानतळावर ३९.८ कोटींचे ड्रग्ज, सोने जप्त; ९ जणांना अटक