१५० किलो स्फोटके भरलेली गाडी राजस्थानमध्ये पकडली 
राष्ट्रीय

१५० किलो स्फोटके भरलेली गाडी राजस्थानमध्ये पकडली

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर हायअलर्टवर असलेल्या पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान स्फोटकांनी भरलेली गाडी राजस्थानच्या टोंक येथे ताब्यात घेतली. कारमध्ये १५० किलो स्फोटके होती. त्यात अमोनियम नायट्रेट होते.

Swapnil S

जयपूर : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर हायअलर्टवर असलेल्या पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान स्फोटकांनी भरलेली गाडी राजस्थानच्या टोंक येथे ताब्यात घेतली. कारमध्ये १५० किलो स्फोटके होती. त्यात अमोनियम नायट्रेट होते. ही स्फोटके वाहून नेण्यामागचा कट काय होता, ती स्फोटके कुठे नेण्यात येत होती, याचा तपास सुरू आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, एक गाडी बुंदी येथून निघाली होती आणि ती टोंक येथे जात होती. याबाबत गुप्त माहिती मिळाली होती, त्या आधारे बरौनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून ही कार रोखण्यात आली. झडती घेतली असता गाडीमध्ये स्फोटकाचा मोठा साठा आढळला.

गाडीमध्ये १५० किलो अमोनियम नायट्रेट होते आणि ते युरियाच्या गोण्यांमध्ये दडवून ठेवले होते. त्याचबरोबर २०० डेंजर एक्स्प्लोझिव्ह कार्टेज आणि सेफ्टी फ्यूज वायरचे साधारण ११०० मीटर सहा बंडलही होते. पोलिसांनी कारमधून स्फोटके घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे.

हेतूबाबत तपास

भंवरलाल (वय ४८), दुलीलाल (वय ३३) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. हे दोघेही करवर बूंदीचे रहिवासी आहेत. कारमध्ये सापडलेल्या स्फोटकांचा वापर कुठे होणार होता, याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. ही स्फोटके ते कोणाकडे देणार होते, याचीही चौकशीही सुरू आहे. ही स्फोटके आणण्याचा हेतू काय होता, याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

समुद्रातील तरंगता कचरा हटवण्यासाठी रोबोटिक बोटी; ३.६ कोटींच्या प्रकल्पाला BMC ची मंजुरी, गेट वे, बधवार पार्क येथील प्रयोग यशस्वी

मुंबई मेट्रो वनची व्यवस्थापन क्षेत्रात भरारी; एकात्मिक आयएमएस-आयएसएमएस प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली मेट्रो

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल