राष्ट्रीय

Video | “नवी नवी नोकरी आहे, महागात पडेल", भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला धमकी

Swapnil S

राजस्थानातील शाहपुरा विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार लालाराम बैरवा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत बैरवा हे एका महिला अधिकाऱ्याला झापताना दिसत आहेत. अतिक्रमणाच्या मुद्यावरुन बैरवा आणि एसडीएम यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर बैरवा यांना राग अनावर झाला आणि त्यांनी महिला अधिकाऱ्याला धमकीच दिली. ते म्हणाले, नवी नवी नोकरी आहे. तुम्ही वाद घालत आहात, वाद घालू नका, तुम्हाला माहीत आहे, हे तुम्हाला महागात पडेल. या व्हिडिओतील महिला अधिकारी बनेडा येथील एसडीएम असल्याचे समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

लालाराम बैरवा हे विकसित भारत संकल्प यात्रेच्या शिबीरात प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. यावेळी बैरवा यांनी अधिकाऱ्यांना कोळसा भट्यांसंदर्भात कारवाईवर प्रश्न विचारला. यावर एसडीएम यांनी 91 नुसार नोटीस दिल्याचे सांगितले. हे उत्तर एकूण बैरवा चांगलेच भडकले. ते म्हणाले, “अतिक्रमण केले तेव्हा तुम्हाला विचारले होते का? जर अतिक्रमम केले तेव्हा तुम्हाला विचारले नाही. तर मग कारवाई करताना का विचारताय?”  ते पुढे म्हणाले, “जनतेने आम्हाला जनतेची कामे करायला निवडून दिले आहे. त्यांची कामे झाली पाहिजे. बनेडा क्षेत्रातील कोळश्याच्या भट्ट्या का हटवल्या गेल्या नाहीत. या आधी आपण कशा प्रकारे काम करत होते, याच्याशी आम्हाला काही घेणे-देणे नाही. मात्र, आता सरकार बदलले आहे. त्यामुळे आपल्या कार्यपद्धतील बदल करा, नाहीतर आपली व्यवस्था करुन ठेवा, तुमची नोकरी नवी-नवी आहे. महागात पडेल.” बैरवा यांनी या महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त