राम मंदिर देणगी चोरी प्रकरण : चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना SIT कडून ‘क्लीनचिट’ (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

राम मंदिर देणगी चोरी प्रकरण : चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना SIT कडून ‘क्लीनचिट’

अयोध्या येथील श्री राम मंदिरात मिळालेल्या देणग्यांमधील कथित चोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय आणि माजी ट्रस्टी अनिल मिश्रा यांना क्लीनचिट दिली आहे.

Swapnil S

अयोध्या : अयोध्या येथील श्री राम मंदिरात मिळालेल्या देणग्यांमधील कथित चोरी प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय आणि माजी ट्रस्टी अनिल मिश्रा यांना क्लीनचिट दिली आहे.

राम मंदिराच्या देणगी व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाल्यानंतर चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी २७ जून रोजी आपापल्या पदांचे राजीनामे दिले होते. देणग्यांचे व्यवस्थापन आणि संकलनाच्या चौकशीचा एक भाग म्हणून एसआयटीने या दोघांचीही कसून चौकशी केली होती. उत्तर प्रदेशच्या गृह विभागाने या कथित देणगी चोरी प्रकरणाचा एसआयटीचा अंतिम अहवाल पुढील कारवाईसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे सोपवला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान चंपत राय यांनी या गैरव्यवहारात आपला कोणताही हात नसल्याचे स्पष्ट केले. संशयित चोरीप्रकरणी त्यांनी स्वतः तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतरच आरोपींना अटक करण्यात आली होती, असे त्यांनी तपासादरम्यान सांगितले. देणगी संकलनात पारदर्शकता राखणे आणि गैरव्यवहार रोखणे ही आपली जबाबदारी होती; त्यामुळे ही बाब निदर्शनास आल्यावर तत्काळ कारवाई केल्याचे राय यांनी स्पष्ट केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यावर पाणीसंकट! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा विभागाचा निर्णय

तांदूळ, ज्वारी, तूर, हरभरा कडाडला; दिवाळीच्या तोंडावर किराणा बजेट कोलमडणार

MPSC च्या आजी-माजी अध्यक्षांची न्यायालयीन चौकशी; मुख्यमंत्री फडणवीस यांची राज्यपालांना शिफारस

हरदीप पुरी, स्मृती इराणी यांचे पत्ते कट; उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी भाजपचे आठ उमेदवार जाहीर

'इंडिगो'चा प्रवास महागला; देशांतर्गत किमान ३७५, तर कमाल १३०० रुपयांची भाडेवाढ